मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापूरच्या रस्त्यावर अवतरली 'बांबूची दुनिया', घराच्या सजावटीसाठी मिळतीय पसंती, Video

कोल्हापूरच्या रस्त्यावर अवतरली 'बांबूची दुनिया', घराच्या सजावटीसाठी मिळतीय पसंती, Video

X
घराच्या

घराच्या सजावटीसाठी बांबूच्या वस्तूंना मोठी मागणी असते. कोल्हापुरकरांची ही आवड लक्षात घेऊन शहरात रस्त्यावरच बांबूची दुनिया अवतरली आहे.

घराच्या सजावटीसाठी बांबूच्या वस्तूंना मोठी मागणी असते. कोल्हापुरकरांची ही आवड लक्षात घेऊन शहरात रस्त्यावरच बांबूची दुनिया अवतरली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Kolhapur, India

  कोल्हापूर, 31 ऑक्टोबर : हॉटेलमध्ये किंवा घराच्या अंतर्गत सजावटीसाठी बांबू पासून बनवलेल्या विविध गोष्टींचा वापर सध्या केला जातो. सजावटीसाठी किंवा वापरासाठी अशा वस्तूंचा वापर करणे हा आजकालचा ट्रेंड बनत चाललाय. कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात अशाच बांबूच्या विविध वस्तू फुटपाथवर विकायला ठेवलेल्या आपल्याला बघायला मिळतात. या बांबूच्या वस्तू बनवून विकायला एक कुटुंब दरवर्षी परप्रांतातून इथे येऊन राहतं. त्यांनी कोल्हापूरच्या रस्त्यावरच बांबूची दुनिया थाटली आहे.

  या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे नाव आहे आर. शंकर. शंकर हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत. स्वत:च्या कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी ते  बाबूंच्या वस्तू बनवून विकण्याचा व्यवसाय करतात. गेली दहा-पंधरा वर्षांपासून ते आंध्रप्रदेशमधून कोल्हापुरात येऊन या वस्तू विकत आहेत.

  कधी सुरू होते विक्री?

  शंकर कुटुंबीय साधारण गणपतीनंतर कोल्हापुरात येतात.  बांबूच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ते आपल्याबरोबर घेऊन येतात. त्यानंतर पुढील काही महिने शहरातील फुटपाथवरच त्यांचा मुक्काम असतो.  दिवसभर वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूच्या वस्तू ते बनवतात. त्यांचा मुलगा आणि ते कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात जाऊन या वस्तू विकून येतात. या शोभेच्या बांबूच्या वस्तू त्याचबरोबर लहान मोठे फर्निचर कोल्हापूरकरांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. विशषत: घरच्या सजावटीसाठी या वस्तूंना मोठी मागणी असते.

  कोल्हापूरकरांना भरली हूडहूडी; स्वेटरने सजली बाजारपेठ, Video

  'आम्ही कोल्हापुरात गणपती नंतर येतो. बांबूच्या जवळपास सगळ्या वस्तू बनवतो. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आम्ही आमच्या गावावरूनच घेऊन येतो. इथे पुढचे काही महिने थांबून आम्ही या वस्तू कोल्हापुरात विकतो. लोकांना या वस्तू आवडतात. बरेचजण विकत घेतात त्यामुळे आमचा चांगला व्यापार होतो,' अशी प्रतिक्रिया विक्रेता आर. शंकर यांनी व्यक्त केली.

  कोणकोणत्या वस्तू  उपलब्ध ?

  शंकर यांनी बनवलेल्या बांबूच्या विविध वस्तू खूपच सुंदर असतात. घरातील सजावटीसाठी लागणारे बांबूचे वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्प, बांबूचे मोडे/स्टूल, लहान मोठ्या आकाराच्या बुट्ट्या, बांबूच्या आरामखुर्च्या, बांबूचे झोपाळे, बांबूच्या लहान-मोठ्या खुर्च्या आणि संपूर्ण सोफा सेट अशा बऱ्याच गोष्टी इथे शंकर यांचे संपूर्ण कुटुंब बनवत असते.

  आता बाळ रडणारच नाही, डॉक्टरांनी तयार केला स्मार्ट पाळणा Video

  किती रुपये आहे किंमत?

  बांबूपासून बनवलेल्या वस्तू या इको फ्रेंडली असतात. त्याचबरोबर त्या बराच काळ टिकतात. त्यामुळे या वस्तूंची किंमत देखील बाजारात थोडी जास्त असते. शंकर यांच्याकडे बांबूचे विविध प्रकारचे लॅम्प 100 ते 300 रूपये,  वेगवेगळ्या डिझाईनच्या बुट्ट्या  50 ते 400 रुपये, मोडे किंवा स्टूल हे 1,000 ते 1,500 तर बांबूच्या पाळण्याची किंमत 2,500 ते 8,000 रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर संपूर्ण सोफा सेटची किंमत ही 20 ते 25 हजाराच्या दरम्यान आहे.

  कुठे मिळेल  बांबूचे साहित्य ?

  कोल्हापुरातील संभाजीनगरकडून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमकडे जाणाऱ्या रोडवर उजव्या बाजूला फुटपाथवर तुम्हाला शंकर यांचे कुटुंब दिसेल. या रोडच्या जवळच त्यांनी या सर्व वस्तू विक्रीसाठी मांडल्या आहेत.

  गुगल मॅपवरून साभार

  बांबूच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पत्ता 

  आयसोलेशन रिंग रोड, निर्माण चौक, कळंबा, कोल्हापूर ४१६००१

  First published:
  top videos

   Tags: Home-decor, Kolhapur