Home /News /maharashtra /

Asian Youth Weightlifting Championship : दोन्ही पाय निकामी, तरीही बाबा चहा विकतो तर आई दवाखान्यात कामगार पण कोल्हापूरच्या निकिताने जगात केलं नाव

Asian Youth Weightlifting Championship : दोन्ही पाय निकामी, तरीही बाबा चहा विकतो तर आई दवाखान्यात कामगार पण कोल्हापूरच्या निकिताने जगात केलं नाव

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या तेरवाड येथील निकिता सुनिल कमलाकर या मुलीने आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.

  कोल्हापूर, 21 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या तेरवाड येथील निकिता सुनिल कमलाकर या मुलीने आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. तिच्या कौशल्याने कोल्हापूरच नाहीतर देशभरात कौतुक होत आहे. उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात स्पर्धा सुरू आहेत. त्या तिने यश मिळवल्यानंतर तिच्या घरच्यांशी संवाद साधण्यात आला. वडील चहा विकून घरचा उदरनिर्वाह करतात. (Asian Youth Weightlifting Championship)

  सुनिल कमलाकर यांना मुलीच्या यशाबाबत विचारण्यात आले यावर ते म्हणाले कि, मुलीने जगभरात नाव केले आहे त्याचा मला खूप आनंद झाला आहे परंतु मला आधी चहा पोहोचवू द्या, मग मी बोलतो,’ असे सांगून दोन्ही पायांनी अपंग असलेल्या सुनील कमलाकर सायकलने बँकेत, शाळेत जिथे जिथे रोज चहा देतात तिथे वेळेवर चहा पोहोचवला. आपल्या कामाशी प्रामाणिक असलेल्या निकिताच्या वडिल एवढे कामात असण्याचे कारण चहा विकला नाही गेला तर घर कसे चालेल या कारणाने ते आपल्या कामात व्यस्त राहिले. 

  हे ही वाचा : 'लोकशाहीची अवस्थाही घसरलेल्या रुपयासारखीच, कारण...'; शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथीळ दत्त महाविद्यालयात निकिता 12 वीचे शिक्षण घेत आहे. तिला पहिल्यापासून वेटलिफ्टिंगची आवड आहे. तिने प्रचंड मेहनत घेत एक महिन्यापूर्वी मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड चम्पियनशिप स्पर्धेत निकिताने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु तिला पदकाविना समाधान मानावे लागले होते. तिच्या मनात जिद्द होती आपल्याला पदक मिळवायचे आहे. तीने पुन्हा पुन्हा सराव सुरू केला अन् यश मिळवले.

  आशियाई यूथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात निकिताने ६८ किलो स्नॅक आणि ९५ किलो क्लीन अँड जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलून रौप्यपदक प्राप्त केले. क्लीन अँड जर्कमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिला विश्वविजय जिमचे प्रशिक्षक विजय माळी, प्रशिक्षक विश्वनाथ माळी, निशांत पोवार यांनी प्रशिक्षणाचे धडे दिले.

  निकिताचे वडील सुनील कमलाकर चहा विकून आपल्या संसाराचा गाडा चालवतात. सुनील कमलाकर आणि त्यांचे वडील शिरोळमध्ये दर्गा चौकात चहाचा गाडा चालवतात. वडील गाड्यावर थांबून चहा विकतात तर सुनील हे शहरातील मुख्य ठिकाणी चहा विकून पैसे कमवतात. कुटुंबीयांचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च चहाच्या गाडीवर भागत नसल्याने निकिताची आई दत्त साखर कारखान्यावरील दवाखान्यात सेविका म्हणून काम करते. या साऱ्या बिकट परिस्थितीतही निकिताने जिद्द बाळगली आणि आज देशाचे नाव उज्ज्वल केल्याने विविध स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

  हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचा मलाही फोन आला होता, सेनेचे आमदार अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट

  तिच्या या प्रवासात कुटुंबीयांसोबत तिचे प्रशिक्षक विजय माळी यांनी तिच्यातील कौशल्य ओळखून इयत्ता पाचवीपासून तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तिच्या यशाचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तिने अशीच तयारी करून ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवावे, अशी इच्छा निकिताचे वडील सुनील कमलाकर यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना व्यक्त केली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Weight, Weight lifting

  पुढील बातम्या