अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 21 जुलै : शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांनी तळ ठोकला आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहे. औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांनी ( shivSena MLA Ambadas Danve) शिंदे गटाने ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. औरंगाबाद शहरातील आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या समोर एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांचा मलादेखील फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे, असं उत्तर दानवेंनी दिलं. ‘मला एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं मी, बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांनी मला तुला मदत केली असल्याचे सांगितले, तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्ही पक्ष म्हणून मदत केली, स्वतः व्यक्तिगत नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे होते म्हणून तुम्ही मदत केली. त्यामुळे तुम्ही देखील भूलथापांना बळी पडू नका, असे देखील पदाधिकाऱ्यांना दानवे यांनी सांगितले आहे. ( पवारांच्या ‘त्या’ निर्णयावर खुलासा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलासा ) आपल्या येथील काही आमदार तुम्हाला सांगितली, तुमच्यासाठी हे केलं, ते केलं. पण त्याला सांगा तुला निवडून मी आणलंय. तुला निवडून येण्यासाठी आम्ही काम केलं, असं सांगा, असं आवाहन दानवे यांनी कार्यकर्त्यांना केलं. ( गावाला पुराचा वेढा; मुलासाठी आईचा पाण्यातून टायरवर प्रवास, मन सुन्न करणारा Video ) ‘कुठल्याही गद्दाराची आठवण येणार नाही, एवढी जनता आपल्यासोबत आहे. कुणाची आठवण येण्याची गरजही नाही. कुणी म्हणेल तुमच्यासाठी इतकं काम केलं आहे, पण शिवसेना होती म्हणून तुम्ही ते काम केलं होतं बाकी, काही नाही, असा टोलाही दानवे यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.