मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापूरकरांच्या जीवावर उठलाय ‘हा’ वास, हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात, पाहा Video

कोल्हापूरकरांच्या जीवावर उठलाय ‘हा’ वास, हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात, पाहा Video

X
कोल्हापूरकरांना

कोल्हापूरकरांना सध्या एका वासाचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.

कोल्हापूरकरांना सध्या एका वासाचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे हजारो नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

कोल्हापूर, 26 मे :  सध्या देशभरात कचऱ्याची समस्या ही सर्वात मोठी समस्या बनून गेलीय.  या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र वाढणारा कचरा आणि कमी पडणारी तोकडी यंत्रणा यामुळे ही समस्या दिवसोंदिवस गंभीर होत आहे. कोल्हापुरात देखील कचरा व्यवस्थापन यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे शहरातील एका भागात कचऱ्यासह दुर्गंधी आणि धुराचे साम्राज्य पसरल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे.

काय आहे प्रश्न?

कोल्हापुरातील कसबा बावडा लाईन बाजार या ठिकाणी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वीज निर्मिती प्रकल्प काही वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. कोल्हापूर शहरात दररोज सुमारे 225 टन कचरा निर्माण होत असतो. या कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया केली जात असे. मात्र काही वर्षांनी कंत्राटदार कंपनीने गाशा गुंडाळला आणि प्रकल्प बंद पडला.

हा प्रकल्प  बंद पडला असला तरी रोज जमा होणारा कचरा वाढतच गेला. कचऱ्याचे डोंगरच इथं निर्माण झाले आहेत. या कचऱ्याला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे इथल्या प्रत्येक नागरिकाला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. आधीच कडाक्याच्या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना आता त्यात सर्वत्र धुर आणि कचऱ्याचा प्रचंड वास याची देखील भर पडली आहे.

बंद पडलेल्या या कचरा प्रक्रिया प्रकल्प परिसरात अनेक घरे आहेत. यापैकी कोणीच्या घरी आजारी व्यक्ती आहेत तर बऱ्याच जणांच्या घरी जनावरे आहेत. या अशा सर्वांना आता रोजच हा धुराचा त्रास सहन करावा लागतोय. प्रशासनाकडून लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते कमी पडत आहेत. आम्ही जगायचं कसं हा प्रश्न सध्या इथल्या नागरिकांसमोर उभा राहिलय. या प्रकल्प परिसरात राहणाऱ्या 20 ते 30 हजार नागरिकांचं आरोग्य सध्या धोक्यात आहे.

पंचाहत्तरीत लग्न केलेल्या आजी-आजोबांचा कसा सुरुय संसार? पाहा स्पेशल रिपोर्ट

काय होतो त्रास ?

या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना रोज नाकाला हात धरून किंवा तोंडाला कापड बांधून, चष्मा लावूनच परिसरात वावरावे लागत आहे. त्याशिवाय इथं उभं राहाणे देखील अशक्य आहे. धुरामुळे श्वसनाचे विकार, डोळ्यात जळजळ, जीव घुसमटणे, चक्कर येणे अशा मरण यातना त्यांन सहन कराव्या लागतात. या जनावरांच्या डोळ्यांतून देखील धुराने पाणी वाहू लागले आहे. दुधारू म्हशींचे दूध आटले आहे तर काहींना ताप येणे अशा समस्याही भेडसावू लागल्या आहेत, अशी माहिती नागरिकांनी दिली.

प्रकल्प सुरू करण्याची गरज

कचरा व्यवस्थापनासाठी उभारण्यात आलेला हा प्रकल्प सध्या बंद असल्यामुळे कचऱ्याचे ढीग रोज टनानं वाढत आहेत. त्यामुळे ही आणखी गंभीर समस्या बनलीय.  ज्या कंपनीने काम हाती घेतले होते, तिने ते अर्धवट सोडले. महापालिका काम चालू ठेवण्यास असफल ठरली. मात्र आता या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. आम्हाला मोकळा श्वास घेऊ द्यावा, अशी मागणी कोल्हापूरकर करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Kolhapur, Local18