जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मालकाला वाचवलं पण लाडक्या खिल्लारी जोडीने साथ सोडली, शेतकरी ढसाढसा रडला

मालकाला वाचवलं पण लाडक्या खिल्लारी जोडीने साथ सोडली, शेतकरी ढसाढसा रडला

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना

कोल्हापूरमधील धक्कादायक घटना

दिलीप खुटाळे आज शेतातील मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडं चालले होते. दरम्यान कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरले

  • -MIN READ Local18 Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 19 एप्रिल : शेतकऱ्यांसोबत शेतात राबणारा बैल हा त्याचा खास साथीदार..त्यामुळे बळीराजा हा आपल्या या लाडक्या बैलाची नेहमी काळजी घेत असतो. कोल्हापूरमध्ये दोन खिल्लारी जातीच्या बैलांनी मालकाची जीव वाचवला पण आपली जीव दिल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथं ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दिलीप खुटाळे या शेतकऱ्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. कालव्यात पडून दिलीप खुटाळे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दिलीप खुटाळे आज शेतातील मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडं चालले होते. दरम्यान कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने दिलीप खुटाळे यांच्यासह बैलगाडी कालव्यात पडली. बैलांना सापती असल्याने पाण्यात हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बूडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. (राज्याच्या नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, हवामान खात्याची गूड न्यूज) यावेळी दिलीप खुटाळे यांनी स्वत: कसं बसं वाचवलं, पण आपल्या या लाडक्या खिल्लारी जोडीला वाचवू शकले नाही. कालव्यातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला. लोकांना बोलावून बैलांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण कालव्यात गुदमरून बैलांचा मृत्यू झाला होता. (pune : पुणेकरांना मोठा दिलासा, मालमत्ता कराबद्दल शिंदे सरकारने घेता मोठा निर्णय) दोन्हीही खिल्लारी बैलांचा मृत्यू झाल्यामुळे दिलीप खुटाळे यांना घटनास्थळावरच रडू कोसळले. या दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे खुटाळे या गरीब शेतकऱ्याचं दोन लाखांचं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे गावकरीही हळहळले होते. या गरिब शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई देवून शेतकऱ्याला हातभार लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात