ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर, 17 मार्च : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. एका बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असताना दुसरीकडे कोल्हापूरमध्ये पेन्शन नको, अर्ध्या पगारात कामावर येतो म्हणत बेरोजगारांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला. कोल्हापुरातील या आंदोलनाची चर्चा सध्या होताना दिसतेय. कोल्हापूरमधील या आंदोलनाची दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. पेन्शन हटाव,महाराष्ट्र बचाव म्हणत आज दुपारी हे आंदोलक दसरा चौकात जमा झाले. एकाच घटकाला पेन्शनचा लाभ देण्यापेक्षा त्याच रकमेतून बेरोजगारांना नोकरी देण्याची मागणी यात करण्यात आली. नोकरी दिल्यास अर्ध्या पगारावर सुद्धा काम करण्याची तयारी या तरुणांनी दर्शवलीय. भाजप कार्यकर्त्याला आक्षेपार्ह पोस्ट महागात, काँग्रेसच्या माजी आमदार समर्थकांनी बेदम चोपलं दरम्यान या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनीही पाठिंबा दिलाय. तर जुन्या पेन्शन वरून सरकारी कर्मचारी जनतेला वेठीस धरत असून त्यांचे आंदोलन मोडीत काढण्याची मागणी त्यांनी केलीय. दरम्यान, आरोग्य कर्मचारीसुद्धा या संपात सहभागी झाले आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिले आहेत. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करत कर्मचारी संपावर आहेत. यासाठी महाराष्ट्र आणि हरयाणातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. तर याआधी राजस्थान, छत्तीसगढ, झारखंडसह काही राज्यांनी आधीच OPS पुन्हा लागू करण्याची घोषणा केलीय. राज्यांमध्ये संपाचे हत्यार उपसले जात असताना केंद्र सरकार मात्र सध्या तरी पुन्हा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या विचारात नाहीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.