बुलढाणा, 17 मार्च : चिखलीमध्ये भाजप कार्यकर्त्याला काँग्रेसच्या माजी आमदाराच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. या मारहाणीत श्याम वाकदकर हे जखमी झाले आहेत. माजी आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाकदकर यांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं हा प्रकार घडल्याचं म्हटलं जातंय.
चिखलीत आज सकाळी नागरिकांना तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाला. चिखलीतील श्री शिवाजी विद्यालयासमोर भाजपच्या श्याम वाकदकर यांना काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा प्रक्रार घडला. माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वडीलांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वाकदकर यांनी फेसबुकवर केली होती, त्यामुळेच हा प्रकार घडलाय. स्वतः राहुल बोंद्रे यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिलाय.
BREAKING : भाजप नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार, डोक्यात दगड घालून केली हत्या, सांगली हादरली
कुटुंबाबद्दल आक्षपरह पोस्ट टाकली हे खपवून घेतला जाणार नाही. आज थोडक्यात झाले,यानंतर परिणाम वाईट होतील , असा इशारा ही माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिलाय. मारहाणीनंतर वाकदकर यांना बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. तर राहुल बोंद्रे याच्या कार्यालयाजवळ पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Buldhana