मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराची धास्ती पाणी पातळी तब्बल 13 फुटांनी वाढ

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराची धास्ती पाणी पातळी तब्बल 13 फुटांनी वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, दि. 09 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. (Kolhapur Rain Update) विशेषतः मागच्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मागच्या 24 तासांत तब्बल 13 फुटांनी वाढ झाली आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता(उत्तर) रोहित बांदिवडेकर यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूःस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Weather Forecast: कुठे रेड, तर कुठे ऑरेंज अलर्ट; मुंबई पुण्यासह याठिकाणी आजही मुसळधार पाऊस

काल (दि.08) दुपारी दोन वाजता दुधगंगा धरणाचे सांडव्यावरील 5 वक्राकार दरवाडे उघडले असून त्यातून 423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे तसेच पाॅवर हाऊस मधून 1000 क्युसेक्स असा एकूण 1423 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.

दरम्यान राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण जवळपास 90 टक्क्यांच्यावर भरल्याने कोणत्याही क्षणी स्वयंचलीत दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरु असून धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात सुरु आहे. आज दिवसभरात राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ शकते. तरी नदीकाठावरील नागरिक तसेच स्थानिक प्रशासन यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Aurangabad : अन्नदानातून अल्लाची सेवा; औरंगाबादची मशीद रोज भागवतेय रूग्णांची भूक, VIDEO

तसेच गगनबावडा-कोल्हापूर रस्त्यावर मांडुकली येथे मुख्य रस्त्यावर पाणी आलेले असल्याने रस्ता बंद केला आहे. दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास राजाराम बंधारा पाणी पातळी 36 फूट 6 इंच इतकी आहे. दरम्यान पंचगंगा नदी इशारा पातळी   -३९ फूट व धोका पातळी ४३ फूट असल्याने कोणत्याही क्षणी पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यातील एकूण 66 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

First published:

Tags: Kolhapur, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur, Weather forecast, Weather update

पुढील बातम्या