मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : अन्नदानातून अल्लाची सेवा; औरंगाबादची मशीद रोज भागवतेय रूग्णांची भूक, VIDEO

Aurangabad : अन्नदानातून अल्लाची सेवा; औरंगाबादची मशीद रोज भागवतेय रूग्णांची भूक, VIDEO

पाणचक्की ( Panchakki Aurangabad ) येथील जमील बेग ( Jamil Baig ) मशिदीमध्ये मोफत तीन वेळेचे जेवण दिलं जातं.

औरंगाबाद 08 ऑगस्ट : औरंगाबाद शहराने ( Aurangabad City ) औद्योगिक वसाहती सोबतच वैद्यकीय विभाग क्षेत्रात देखील चांगली प्रगती केली आहे. शहरात मोठमोठे रुग्णालय आहेत. या रुग्णालयांमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील रुग्ण (Patient) उपचारासाठी येत असतात. मात्र, गाव सोडून येणाऱ्या रुग्णांकडे व नातेवाईकांकडे जेवणाची व्यवस्था नसते अशाच गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पाणचक्की ( Panchakki Aurangabad ) येथील जमील बेग ( Jamil Baig ) मशिदीमध्ये मोफत तीन वेळेचे जेवण दिलं जातं. गेल्या 10 वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. अशी झाली सुरुवात  औरंगाबाद शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात येणारे गोरगरीब रुग्ण पाणचक्की येथील 450 वर्ष जुन्या असलेल्या जमील बेग मशिदीमध्ये जेवणासाठी व औषध गोळ्यांसाठी मदत मागण्यासाठी 10 वर्षांपूर्वी येत होते. ही बाब तामिरे मिल्लतचे माजी सचिव अब्दुल हलीम हशर यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी गरजू रुग्णांना मोफत जेवण देण्याची संकल्पना मांडली आणि तेव्हापासून त्यांनी मोफत जेवण देण्यासाठी सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी 2 किलो तांदळाची खिचडी वाटप केली होती. तेव्हा पासून आजपर्यंत गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण दिले जात आहे. हेही वाचा : Beed : बीडमध्ये बनते कच्छची फेमस दाबेली; एकदा खाल तर खातच राहाल, VIDEO पक्ष संघटनेचा उपक्रम नाही  मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. हे सेवाभाव लक्षात घेऊन येथील प्रत्येक नागरिक काम करत असतो.  येथे सुरू असलेला हा उपक्रम कुठल्याच पक्ष संघटना किंवा कोण्या व्यक्तीच्या नावाने चालत नाही. आम्हाला कुठल्याच पक्ष संघटनेतर्फे देखील पैसे येत नाहीत. आम्हाला या ठिकाणी येणारा  प्रत्येक व्यक्ती हा त्याला वाटेल तो पैसा देतो त्याच्यातूनच हा उपक्रम सुरू आहे, असे ऑल इंडिया तामिरे मिल्लत संघटनेचे सचिव अब्दुल मोईद हशर सांगतात. 10 वर्षात कधीच कमतरता नाही गेले 10 वर्षांपासून या मशिदीमध्ये हा उपक्रम सुरू आहे. हा उपक्रम सुरू करणाऱ्यांनी 10 वर्षांमध्ये एकही सुट्टी घेतली नाही. दिवसाला हजारो रुग्णांना जेवण दिले जाते असे असताना देखील या ठिकाणी 10 वर्षांमध्ये एकही दिवस असा नाही की त्यामध्ये किचनमध्ये साहित्य कमी पडलं नागरिक जसे जेवायला येतात.  तसेच या ठिकाणी हवे  असलेले सामान येत असतं आणि त्यामुळेच या ठिकाणी कशाचीच कमी पडत नाही. येथे जेवणासाठी येणारा व्यक्ती हक्काने या मशिदीमध्ये जेवणासाठी येत असतो. येथे आलेल्या कुठल्याच व्यक्तीला तुम्ही कोण आहात कोणासाठी जेवण पाहिजे असा प्रश्न केला जात नाही किंवा याच्यासाठी एक रुपया देखील शुल्क आकारले जात नाही. मशिदीमध्ये जेवणासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती हा आमचा पाहुणा नसून तो अल्लाहाचा पाहुणा आहे या भावनेने आम्ही त्याची सेवा करत असतो आणि त्यामुळे त्याचा येथे सन्मान देखील केला जातो, असे येथील सदस्य सांगतात. जेवण वाटपाची वेळ काय?  जेवणामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या जेवणाचा समावेश आहे. जेवण वाटप करत असताना जेवणाची मर्यादा नाही ज्याला जेवढे पाहिजे तेवढे पोटभर जेवण दिलं जातं. सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान नाश्ता मिळतो दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान जेवण मिळतं आणि त्यानंतर सायंकाळी 8 ते 9 च्या दरम्यान रात्रीचे जेवण मिळतं. जेवणामध्ये पोळी भाजी भात दिला जातो. हाडाचा आजार असलेल्या रुग्णाला मटण सूप आवश्यकता असते तो देखील या ठिकाणी दिले जाते. हेही वाचा : Aurangabad : संसार सावरला इतरांनाही आधार दिला; महिलेची जिद्द वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान VIDEO 16 रुग्णालयांना दिले जाते जेवण घाटी रुग्णालय जवळ असल्यामुळे या ठिकाणचे रुग्ण स्वतः जेवण घेऊन जातात. मात्र, या ठिकाणाहून दूर असलेल्या 16 वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये रिक्षाच्या माध्यमातून जेवण पाठवलं जातं. रोजच्या ठरलेल्या वेळेमध्ये त्या रुग्णालयातील वॉर्डन किंवा कर्मचारी रुग्णांना जेवणाची वेळ झाल्याची माहिती देत असतात. त्यामुळे रुग्णांना याची माहिती मिळते. दिवसाला मशिदी तर्फे 1600 रुग्णांची जेवणाची सोय भागवली जाते.  पाहुणचार करण्याची परंपरा औरंगाबाद शहर ऐतिहासिक शहर आहे. या शहरांमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार करणे येथील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. येथील अशी परंपरा असल्यामुळे आम्ही देखील या शहरांमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आदर करतो आणि याच भावनेतून आम्ही देखील या रुग्णांची सेवा करण्याचे काम करत आहोत असेही ऑल इंडिया तामिरे मिल्लत संघटनेचे सचिव अब्दुल मोईद हशर यांनी सांगितले. गुगल मॅप वरून साभार कसे पोहचाल जमील बेग मशिदी पर्यंत? जमील बेग मशिद, V8Q8+W77, पाणचक्की रोड, पाणचक्की, नागसेनवन, औरंगाबाद, महाराष्ट्र  431001 या पत्त्यावर तुम्ही जाऊ शकता.
First published:

Tags: Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या