मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला पण महापुराची भिती कायम, नागरिकांचे स्थलांतर

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला पण महापुराची भिती कायम, नागरिकांचे स्थलांतर

राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. (Kolhapur Rain Update) दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच पावसाने महापुराचा फटका बसत असतो.

राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. (Kolhapur Rain Update) दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच पावसाने महापुराचा फटका बसत असतो.

राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. (Kolhapur Rain Update) दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच पावसाने महापुराचा फटका बसत असतो.

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 11 ऑगस्ट : राज्यात मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले आहे. (Kolhapur Rain Update) दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच पावसाने महापुराचा फटका बसत असतो. झालेल्या पावसाने जिल्ह्यातील नद्यांना धोका पातळीवरून वाहत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी गावातील नागरिकांना कोल्हापूर प्रशासनाने सुरक्षित स्थळी हालवण्याची प्रक्रीया  सुरू केली आहे. तसेच राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले असल्याने पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. 

मागच्या 24 तासांत पाऊस थांबला असला तरी घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पंचगंगा, कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. कसबा बावडा ते शिये मार्गावर तस्ते ओढ्यावरही पाणी आले. पाणी पातळी वाढत असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.

हे ही वाचा : अद्भुत! धरतीवरून अवकाशात कोसळली वीज, कधीच पाहिला नसेल असा निसर्गातील चमत्कार; Watch Video

पुराच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने पूरग्रस्तगांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रयाग चिखलीतील ग्रामस्थांचे दिवसभर स्थलांतर चालू होते. मंगळवारी रात्री व बुधवारी दिवसभरात सुमारे 467 कुटुंबांतील 1,593 ग्रामस्थांचे, तसेच 1,042 जनावरांचे स्थलांतर झाले आहे.

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाशेजारील जगबुडी पुलाजवळ पुराचे पाणी वाढल्याने या ठिकाणची वाहतूक बंद केली आहे. बुधवारी सकाळी 12 पासून केर्लीजवळ बॅरिकेडस् लावून कोल्हापूरकडून येणारी वाहतूक जोतिबा रोडमार्गे वळविण्यात आली आहे. बुधवारी रात्री नऊपर्यंत रेडेडोहजवळ अद्याप पुराचे पाणी रस्त्याकडेलाच होते.

हे ही वाचा : Trekking Quotes: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा ‘हे’ सुंदर ट्रेकिंग कोट्स, मिळेल प्रवासाची प्रेरणा

प्रयाग चिखली गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर अद्याप पाणी आलेले नाही; मात्र चिखली ते वरणगे पाडळीदरम्यान क्षेत्र प्रयाग ठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. पाणी सतत वाढत असल्यामुळे ग्रामस्थांनी दुभत्या जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे पुराच्या पाण्यात दिवसभर व रात्री उशिरापर्यंत वाढच होत राहिली. सद्यस्थितीत कोणतीही गंभीर स्थिती निर्माण झाली नसली, तरी पुराची धास्ती कायम आहे.

First published:

Tags: Kolhapur, Rain fall, Rain flood, Rain in kolhapur, Weather warnings

पुढील बातम्या