मुंबई, 28 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. आपल्या राशीतील बदलत्या ग्रहांच्या स्थितीचा परिणाम आपल्यावर होत असतो. येणाऱ्या समस्यांची चाहूल आधीच लागली तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं होऊन जातं यासाठीच जाणून घ्या कसा असेल आपला आजचा दिवस. मेष - कुटुंबीयांसोबत जास्त वेळ घालवा. आज आपल्याला आनंद होईल. एकटेपणाच्या भावनेतून बाहेर पडा. गुंतवणुकीमुळे उत्पन्नात वाढ होईल. वृषभ- आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूक करण्याआधी काळजी घ्या. प्रेमात निराशा मिळेल. मिथुन- अडथळ्यांमुळे नाराज होऊ नका. प्रिय व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर शंका घेऊ नका. घाईनं निर्णय घेतल्यास पाश्चाताप करावा लागेल. कर्क- पराभवातून आपण शिकलं पाहिजे. आपल्या कामाला प्राधान्य द्या. मित्रांसोबत बोलल्यानं मन हलकं होईल. सिंह - जोडीदाराचा मूड खराब असू शकतो. त्यामुळे आपला दिवस तणावपूर्ण असेल. अवास्तव मागण्यांना बळी पडू नका. कन्या- कुटुंबातील वृद्ध व्यक्तींची आज विशेष काळजी घ्या. जोडीदारासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करा. फोनवर सतत बोलणं डोकेदुखीचं कारण ठरू शकतं. तुळ- आज आपल्याला प्रेरणा मिळेल. भीती आणि शंकांना दूर ठेवा. अस्थिर स्वभावाचा आपल्याला त्रास होईल. चिडचिड होणार नाही याकडे लक्ष द्या. वृश्चिक- रागावर नियंत्रण ठेवा. घाईनं निर्णय घेऊ नका. प्रिय व्यक्तीला दुखवू नका. धनु- कुटुंबातील सदस्यांसह तुम्हाला थोडा त्रास होईल, परंतु यामुळे तुमची मानसिक शांती अस्वस्थ होऊ देऊ नका. एकतर्फी प्रेम आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. मकर- विश्वास तोडू नका. आपल्या अपेक्षेनुसार निकाल न आल्यास निराश होऊ नका. कुंभ- गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल. वाढत्या अनुभवाचा फायदा होईल. मीन- इतरांवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका कारण त्याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.