Home /News /money /

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर काय?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर काय?

सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये (Petrol Diesel Price) कोणताही बदल केलेला नाही.

  मुंबई, 6 जुलै : जागतिक बाजारात गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किंमती (Crude Oil Price Drop) प्रति बॅरल सुमारे 9 डॉलरने कमी झाल्या आहेत. मंदीच्या अपेक्षेने इंधनाचा वापर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर ही घट दिसून आली आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये (Petrol Diesel Price) कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत, तर क्रूडच्या किमती एका वेळी प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 113.8 डॉलर होती, जी आज सकाळी प्रति बॅरल 105.4 डॉलरवर आली. WTI ची किंमत प्रति बॅरल सुमारे 101 डॉलर आहे. कोणत्याही स्कीममध्ये गुंतवणूक करण्याआधी 'ही' केस वाचा, महिलेने तब्बल 4 अब्ज डॉलरचा घातला गंडा
  चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर >> मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुप >> दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर >> चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर >> कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर Income Tax: आयकर भरताना ही माहिती लपवता येणार नाही; चेक करा डिटेल्स दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
  Published by:Pravin Wakchoure
  First published:

  Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

  पुढील बातम्या