मुंबई, 29 ऑगस्ट : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच आता हवामान खात्याने राज्यात पावसासंदर्भात शक्यता व्यक्त केली आहे. राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तसेच बहुतेक ठिकाणी दुपार नंतरच पाऊस होईल, असेही हवामान खात्याने व्यक्त केले आहे. 29 ते 2 सप्टेंबर राज्यातील पाऊस परिस्थिती - 29 ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनर पुणे, औरंगाबाद जालना, परभणी, बीड, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. 30 ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
29/08,राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता. बहुतेक ठिकाणी 🌩 दुपार नंतरच.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 29, 2022
अन्य ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, मुंबई ठाणे सहीत ..
IMD pic.twitter.com/Ej0Hq5FwRi
31 ऑगस्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 सप्टेंबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात वीजेच्या गडगडाट, सोसाट्याचा वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हेही वाचा - Reliance AGM 2022: चॅटिंगसोबतच शॉपिंगही करता येणार; Jio-Meta एकत्र येत जिओमार्ट Whatsapp वर लॉन्च करणार 2 सप्टेंबर : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.