मुंबई, 29 ऑगस्ट : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची RIL वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले आहेत. यावेळी रिलायन्स आणि मेटा (Meta) एकत्र काम करणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. रिलायन्स जियो आणि मेटा एकत्ररित्या जिओमार्ट व्हॉट्सअॅपवर लॉन्च करण्यास मदत करणार आहेत. यामुळे पहिल्यांना ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर एण्ड टू एण्ड शॉपिंगचा अनुभव घेता येईल. मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलं की, भारतात जिओसोबत आमची भागिदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. व्हॉट्सअॅपवर हा आमचा पहिलाचा एण्ड टू एण्ड शॉपिंग अनुभव असेल. लोक आता जिओमार्टवरुन व्हॉट्सअॅपवर किराणा खरेदी करु शकतील. मुकेश अंबानी यांनी म्हटलं की, आमचं व्हिजन भारताला जगातील आघाडीची डिजिटल सोसायटी म्हणून पुढे नेण्याचं आहे. प्रत्येक भारतीयाचं दैनंदिन जीवन सुखकर झालं पाहिजे. त्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. भारतातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी आणि देशातील आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी मेटा आणि जिओ एकत्र येत आहेत. व्हॉट्सअॅपवरील जिओमार्टमुळे लाखो व्यवसाय ग्राहकांशी जोडले जातील. विक्रमी नोकऱ्यांची निर्मिती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सांगितले की, रिलायन्सने रोजगार निर्मितीत नवा विक्रम केला आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये 2.32 लाख नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. रिलायन्स रिटेल आता भारतातील सर्वात मोठी नोकरी निर्माण करणारी कंपनी आहे.
रिलायन्स वार्षिक कमाई 100 अब्ज डॉलर पार करणारी भारतातील पहिली कॉर्पोरेट बनली आहे. रिलायन्सचा एकत्रित महसूल 47% वाढून 7.93 लाख कोटी किंवा 104.6 अब्ज डॉलर झाला आहे. रिलायन्सच्या वार्षिक एकत्रित EBITDA ने 1.25 लाख कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला, अशी माहिती देखील यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली. (Disclaimer: Network18 आणि News18lokmat चॅनेल/वेबसाइट ची संचालक संस्था ही एक स्वतंत्र मीडिया ट्रस्ट आहे ज्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)