Home /News /maharashtra /

लग्नात अक्षदा पडल्यानंतर वाहिला रक्ताचा पाट, भरमंडपात तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून

लग्नात अक्षदा पडल्यानंतर वाहिला रक्ताचा पाट, भरमंडपात तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून

लग्नसमारंभात डीजेवर नाचत असताना धक्का लागल्यामुळे दोन गटात वाद झाला.

    नागपूर, 21 जानेवारी : लग्नात मानपानाचे नाट्य नेहमी पाहण्यास मिळतं.  परंतु, नागपुरमध्ये डीजेवर नाचताना धक्का लागल्यामुळे राग धरून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक  घटना नागपूरमध्ये घडली आहे. कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील अमृत लॉन येथे गणेश नंदांवर याच्याकडे लग्न होतं. रात्री 9.30 च्या सुमारास वर पक्ष  डीजेच्या तालावर नाचत गाजत लॉनमध्ये पोहोचलं. त्यावेळी वधूकडील काही मंडळीही डीजेवर नाचण्यात सहभागी झाले. अचानक गर्दी झाल्यामुळे तरुणाला धक्का लागला. त्यामुळे  वधू आणि वर पक्षात वाद झाला. दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर वाद संपुष्टात आला होता. त्यानंतर लॉनमध्ये लग्नसोहळाही आटोपला होता. परंतु, मध्यरात्री 12  च्या दरम्यान काही लोकं तिथे आले आणि वर पक्ष आणि  वधू पक्षाच्या लोकांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत निखिल लोखंडे हा 26 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या निखिलचा मृत्यू झाला. रुग्णालयात त्याला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी कळमना पोलिसांनी वर पक्षांकडील 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. उल्हासनगरमध्ये पाच सहा जणांच्या टोळीने केली तरुणांची निर्घृण हत्या दरम्यान, उल्हासनगरमध्ये मध्यरात्री उशिरा पाच सहा जणांच्या टोळीने एका तरुणांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. दीपक भोईर असं हत्या झालेल्या तरुणांचे नाव आहे. दरम्यान हत्येचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उल्हासनगर शहरात कायदा अशी सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत हे हत्येचा हा सीसीटीव्ही पाहिल्यावर समजते. उल्हासनगरच्या नेहरू चौक परिसरात माणेरे गावात राहणाऱ्या दीपक भोईर या तरुणांची पाच ते सहा जणांच्या टोळीने निर्घृण हत्या केली. हत्येचा हा  थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून अंगावर शहरे आणणारा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या त्याच्याच ओळखीच्या नरेश उर्फ बबल्याने केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून पंचनामा केला आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अटक होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी  घेतलाय. उल्हासनगर झोन ४ चारमध्ये वर्षभरात १७ हत्या झाल्या आहेत. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण करण्यात उल्हासनगर पोलीस पूर्णपणे अपयशी ठरेल आहेत. हे अधोरेखित होतंय. व्यापारी शहर असलेल्या उल्हासनगर ओळख आता पुन्हा गुन्हेगारी शहर म्हणून होत असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि  व्यापारी या शहरात प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Youth

    पुढील बातम्या