जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ते दोघे रक्त्याच्या थारोळ्यात पडले होते अन् लोक फोटो काढत होते, एकाने सोडला जीव, LIVE VIDEO

ते दोघे रक्त्याच्या थारोळ्यात पडले होते अन् लोक फोटो काढत होते, एकाने सोडला जीव, LIVE VIDEO

(वाशिममधील घटना)

(वाशिममधील घटना)

मानोरा शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या आणि नागरिकांची कायम वर्दळ असलेल्या शिवाजी चौकात 8 ते 10 जणांनी दोन तरुणांवर जीवघेणा चाकू हल्ला केला

  • -MIN READ Washim,Maharashtra
  • Last Updated :

किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 26 मे : वाशिममध्ये मन सुन्न करणारी एक घटना घडली आहे. भररस्त्यावर एका दोन तरुणांवर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने चाकूने प्राणघातक हल्ला केला. पण रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या या तरुणांची मदत करण्याऐवजी लोक मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात मग्न होते. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मानोरा शहरातील शिवाजी महाराज चौकात भर दिवसा दोन तरुणांवर 8 ते 10 जणांनी जीवघेणा केला चाकू हल्ला केल्याने यातील एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी बेलोरा येथील शिवा उघडे या तरुणाचा मानोरा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर भुली येथील राहुल चव्हाण या गंभीर जखमी तरुणाला पुढील उपचारासासाठी यवतमाळला पाठविण्यात आले आहे.

जाहिरात

मानोरा शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या आणि नागरिकांची कायम वर्दळ असलेल्या शिवाजी चौकात 11.30 वाजता 8 ते 10 जणांनी दोन तरुणांवर जीवघेणा चाकू हल्ला केला. या हल्ल्यात शिवदास विलास उघडे (वय 18) याचा मृत्यू झाला आहे. तर राहुल मनोहर चव्हाण ( वय 29) हा जखमी झाला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. यावेळी अनेक नागरिक सैरावैरा पळाले. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी दोन्ही तरुण मदतीसाठी याचना करत होते. मात्र काही जण या गंभीर जखमींचे मोबाईलमध्ये व्हिडीओ, फोटो घेत होते.

News18लोकमत
News18लोकमत

चाकू हल्ला झाल्याने भीती पोटी कुणीही त्यांना मदत केली नसल्याचे बोलले जात असले तरी या गंभीर जखमी तरुणांना तत्परतेने दवाखान्यात उपचारासाठी पाठविणे आवश्यक होते. रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या शिवा उघडे आणि राहुल चव्हाण या दोघांना तब्बल 20 ते 25 मिनिटांनी पोलीस आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र शरीरावर चाकूचे तीन ते चार वार खोलवर असल्याने अति रक्तस्त्राव होऊन शिवा उघडेचा मानोरा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. तर राहुल चव्हाणला पुढील उपचारासाठी यवतमाळला पाठविण्यात आलंय. (बादलीत लघवी करून मोलकरणीचं धक्कादायक कृत्य, CCTV फुटेज पाहून सगळे हादरले, कोर्टाने सुनावली शिक्षा) या जीवघेण्या चाकू हल्ल्या नंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून मानोरा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दोन तरुणांवर जीवघेणा चाकू हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मानोरा सारख्या शांत आणि छोट्या शहरात अशी घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात