मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड, 26 मार्च : मागच्या वेळेस नांदेडला आलो तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचं काम तेलंगणात आहे. इकडे का येता? तुम्ही तेलंगणासारख्या सवलती द्या मी तुमच्या राज्यात पाय ठेवणार नाही, असे थेट आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी फडणवीस यांना दिले. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री केसीआर बोलत होते. या सभेत माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. शेतकऱ्यांना पेरणीसाठी दोन हंगामात दहा हजार रूपये द्या, शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत पाणी आणि विज द्या, शेतकऱ्यांना पाच लाखाचा विमा द्या, हमीभावाने शेती माल विकत घ्या. फडणवीस तुम्ही ही कामे करा मी तुमच्या राज्यात येणार नाही असे चंद्रशेखर राव म्हणाले. बीआरएसवने महाराष्ट्रात प्रवेश केला असून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सवलती देण्याची घोषणा केली आहे. बीआरएस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात नोंदणी केली आहे. आता बीआरएस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची केली. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद निवडणूक बीआरएस लढवणार असल्याची घोषणा केसीआर यांनी केली आहे. वाचा - मालेगावातील सभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का! शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश फडणवीसांनी हे करून दाखवावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याविषयी सांगत होते की, आपले काम तेलंगणात आहे तेथे पाहा येथे काय काम? मी म्हणतो, मी भारताचा नागरीक आहे, भारताच्या प्रत्येक राज्यात येथे काम आहे. तेलंगणा जे मॉडेल महाराष्ट्रात लागू करा आम्ही शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी प्रति एकर दहा हजार रुपये देतो तुम्ही द्याल का? शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज द्यायला हवी ती द्याल का? शेतकऱ्यांना प्रकल्पातून पाणी दिले जाते ते मोफत द्यायला हवी ती द्याल का? कुणा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये द्यायला हवी ती द्याल का?
केसीआर म्हणाले, दलित, आदीवासी शतकांपासून त्रस्त आहे. हे देश आणि समाज म्हणून योग्य नाही,. त्यांचा त्रास कमी व्हायला हवा. तेलंगणातल आम्ही या वर्गातील प्रत्येकांना दहा लाख रुपये देतो. ते परत घेतही नाही. दलित बंधू ही योजना मी लागू केलेली आहे. महाराष्ट्रात ही योजना लागू करा फडणवीसजी आम्ही येणे बंद करू.