मुंबई, 24 नोव्हेंबर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर दावा सांगण्यास सुरूवात केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये बोम्मई यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं आहे. काय आहे बोम्मई यांच्या ट्वीटमध्ये? ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढंही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत’, असं ट्वीट बोम्मई यांनी केलं आहे.
ಕರ್ನಾಟಕದ ಗಡಿ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಿಂಚೂ ಜಾಗವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೊಡುವ ಪ್ರಶ್ನೆಯೇ ಇಲ್ಲ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವ ಕನ್ನಡ ಭಾಷಿಕ ಪ್ರದೇಶಗಳಾದ ಸೊಲ್ಲಾಪುರ, ಅಕ್ಕಲಕೋಟೆ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಸೇರಬೇಕೆನ್ನುವುದು ನಮ್ಮ ಆಗ್ರಹವಿದೆ.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 23, 2022
2/3
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ 2004 ರಿಂದಲೂ ಎರಡೂ ರಾಜ್ಯಗಳ ಗಡಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಕ್ಯಾತೆ ತೆಗೆದು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ದಾವೆ ಹೂಡಿದೆ. ಇದುವರೆಗೂ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿಲ್ಲ. ಮುಂದೆಯೂ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ನಮ್ಮ ಕಾನೂನು ಹೋರಾಟವನ್ನು ಪ್ರಬಲವಾಗಿ ಮಾಡಲು ಸನ್ನದ್ದರಾಗಿದ್ದೇವೆ.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 23, 2022
3/3
महाराष्ट आणि कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकारण तापलेलं असताना आता कर्नाटकनं नवी कुरापत काढली. सांगलीतल्या जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गांभीर्यानं विचार करतंय, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केलं. जतमधील 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्रानं गांभीर्यानं विचार करावा असंही बोम्मई म्हणाले. पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठं विधान केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जत तालुक्यावर कर्नाटकनं वक्रदृष्टी टाकल्याचं स्पष्ट होतंय. ‘कर्नाटक, महाराष्ट्र वादाला काँग्रेसच जबाबदार’, भाजपकडून एस.एम. जोशींच्या ‘त्या’ पुस्तकाचा दाखला