मुंबई : भाजप नेते केशव उपाध्ये यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला. महाराष्ट्रातले उद्योग जे बाहेर गेले ते महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना गेले. मात्र आता विरोधकांनी या सरकारच्या बदनामीची सुपारी घेतली की काय असं वाटत असल्याचा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे. नेमकं काय म्हटलं उपाध्ये यांनी केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातले उद्योग जे बाहेर गेले ते महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना गेले. मात्र विरोधकांनी सध्याच्या सरकारच्या बदनामीची सुपारी घेतली आहे असं आता वाटत असल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा काँग्रेसला टोला लगावला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक वादावर प्रतिक्रिया महाराष्ट्र, कर्नाटक वादावर बोलताना हा वाद काल परवा सुरू झाल्यासारंख काँग्रेस शिवसेनेचे नेते बोलत आहेत. एस. एम. जोशी यांच्या एका पुस्तकात महाराष्ट्र कर्नाटक सिमप्रश्नावर भाष्य केले आहे. ते भाजपचे विरोधक होते. त्यांच्या आत्मचरित्रात एक उल्लेख आहे. त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सिमाप्रश्नावर मोठा लढा दिलाय. त्यांनीच काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यांनी ‘मी एस. एम.’ या पुस्तकात काँग्रेसवर आरोप केला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर काँग्रेसने अन्याय केला अस ते आपल्या पुस्तकात म्हणतात असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दरम्यान भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर देखील केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्रिवेदी यांची क्लिप मी पाहिलेली आहे. त्यात त्यांनी माफी अस म्हटलेलं नाही. पत्र असा उल्लेख केलेला आहे, तरीदेखील वरिष्ठ याबाबत काय ती भूमिका स्पष्ट करतील असं उपाध्ये यांनी म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.