औरंगाबादमधील करिना वाघिणही कोरोना पॉझिटिव्ह? उद्या येणार चाचणीचा अहवाल

औरंगाबादमधील करिना वाघिणही कोरोना पॉझिटिव्ह? उद्या येणार चाचणीचा अहवाल

करिना वाघिण अन्न-पाणी घेत नाही, शिवाय तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे

  • Share this:

औरंगाबाद, 23 जून : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. प्राण्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातच औरंगाबादमधील प्राणिसंग्रहालयातील करिना वाघिणीची आज कोविड चाचणी करण्यात आली आहे.

औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयातील करिना वाघिणीची प्रकृती गंभीर झाली आहे. दोन दिवसांपासून तिला अन्न जात नाही, त्यामुळे तिला सलाईन लावण्यात आलं आहे. तिला अतिशय अशक्तपणा आला आहे. आज (मंगळवारी) तिची कोरोना चाचणी करण्यात आली असून उद्या त्याचा अहवाल येणार आहे. त्यानंतरच तिला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबतची माहिती समोर येईल.

हे वाचा-लॉकडाऊनमुळे गमावली शिक्षकाची नोकरी; उदरनिर्वाहासाठी आता डोसा विकण्याची वेळ

करिना ही वाघिण 6 वर्षांची आहे. यापूर्वी अमेरिकेतील एका प्राणिसंग्रहालयातील वाघाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून सर्व प्राणिसंग्रहालयाने अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. करिना वाघिणीचे कोरोनाचा चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहे. डॉक्टरांनी पीपीई किट परिधान करुन वाघिणीच्या लाळेचे नमुने घेतले. उद्या सायंकाळपर्यंत याचा अहवाल येणार आहे. त्याशिवाय तिच्या रक्ताचे व लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

हे वाचा-प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान रुग्णालयात दाखल; श्वासोच्छवासाचा होतोय त्रास

देशभरात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थिती प्राण्यांमध्येही कोरोनाचा फैलाव होतो की काय याबाबत भीती व्यक्त केली जात आहे.

 

First published: June 23, 2020, 10:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading