मुंबई, 23 जून : बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल करावे लागले. पिंकविलाच्या अहवालानुसार श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्या 71 वर्षांचा आहेत.
सरोज खानने बॉलिवूडमध्ये हिट गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या शिकवलेल्या नृत्यामुळे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचं करिअर झालं आहे. 1983 साली त्यांनी 'हिरो' चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. नृत्यदिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट 'कलंक' हा आहे. याशिवाय त्यांनी मिस्टर इंडिया, चांदणी, बेटा, तेजाब, नागीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथिया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरू, नमस्ते लंडन, जब वी मेट, एजंट विनोद, राउडी राठौर, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका " या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Saroj khan