मुंबई, 27 ऑक्टोबर : ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) अटक करण्यात आलेला आर्यन खान (Aryan Khan) याला आज जामीन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र आज मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत त्याला दिलासा देण्यात आलेला नाही. आजही त्याच्या जामीनावर कोर्टाकडून निर्णय घेण्यात आलेला नाही.
त्यामुळे आर्यन खान याला आणखी एक दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे. (Aryan Khan Bail Hearing Today Live Updates) उद्या गुरुवारी दुपारी २.३० वाजल्यानंतर या प्रकरणात सुनावणी सुरू होईल, असं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे कोर्टात मुनमुन धमेचा याच्या वकिलांनी आपला पक्ष कोर्टासमोर मांडला. मुनमुनने ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं. तिच्याजवळ काही सापडलेलंही नाही. त्याशिवाय मुनमुनचा आर्यन आणि अरबाजशी काहीही संबंध नसल्याचं वकिलाने सांगितलं.
Drugs-on-cruise case: Lawyers of accused Aryan Khan, Munmun Dhamecha & Arbaz Merchant conclude arguments on their bail applications before Bombay HC; ASG Anil Singh for NCB will respond to the arguments tomorrow pic.twitter.com/M3Cb88m4fK
— ANI (@ANI) October 27, 2021
बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन(Aryan Khan Drugs Case) खानच्या ड्रग्स प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप आलं आहे. अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Pandey) आणि आर्यन खानच्या चॅटसंबंधी नवी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे अनन्या पांडेच्या अडचणींत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.
आर्यन खानच्या प्रकरणाला दिवसेंदिवस गंभीर वळण लागत आहे. या प्रकरणामध्ये अनेक आश्चर्यकारक खुलासे होत आहेत. काही दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव या प्रकरणामध्ये समोर आलं होतं. त्यांनतर सलग ३ दिवस NCB ने अनन्याची चौकशी केली होती. एका व्हॉट्सऍप चॅटच्या आधारे अनन्याला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. ही चॅटिंग आर्यन आणि अनन्यामध्ये झाली होती. त्यांनतर आज पुन्हा अनन्या आणि आर्यन खानचं नवं व्हॉट्सऍप चॅट समोर आलं आहे. हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
काय आहे हे चॅट-
आर्यन खान- तू गांजा घेऊन आली आहेस का?
अनन्या पांडे- हा मी आणत आहे.
आर्यन खान- मी गुपचूप तुझ्याकडून घेईन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, Drugs, High Court, Mumbai