मुंबई, 17 नोव्हेंबर : हर हर महादेव या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर 8 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. दरम्यान यावरून राज्यात प्रचंड गदारोळ माजला होता. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांना दिलासा मिळाल्याने या वादावर काहीसा पडदा पडला होता. परंतु जितेंद्र आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटावरून नवे वळण दिले आहे. त्यांनी थेट बाजीप्रभुंच्या वंशजांनाच समोर आणलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. हर हर महादेव या चित्रपटावर अखेरीस हा कुठल्याही ऐतिहासिक संदर्भाला धरुन चित्रपट नाही असे बाजीप्रभू देशपांडे यांच्या सर्व वंशजांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता तरी त्याचे समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील का ? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, कि हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का. असे सवाल आव्हाड यानी केला आहे.
आता तरी त्याचे समर्थन करणा-यांचे डोळे उघडतील का ? किंवा ज्यांनी त्या चित्रपटाला आवाज दिला आहे ते तरी मागणी करतील का, कि हा चित्रपट दाखवू नका आणि इतर भाषेमध्ये देखील हाच चित्रपट दाखवणार आहेत. तो ही रद्द करतील का.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 16, 2022
हे ही वाचा : ‘उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर’…, शिंदे गटाकडून ठाकरेंवर प्रहार
काय आहे नेमकं प्रकरण?
मागच्या दोन दिवसांपूर्वी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात विनयभंगाची घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
हे ही वाचा : जळगावात दूध संघ अपहार प्रकरणाला नवे वळण, एकनाथ खडसेंना धक्का
या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chatrapati shivaji maharaj, Jitendra awhad, Movie release