मुंबई, 17 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन स्मृती दिनानिमीत्त दर्शन घेतले. दरम्यान यावरून चांगलच राजकारण तापलं आहे मुख्यमंत्री शिंदे स्मृतीस्थळावरून जाताच लगेच शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकानी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. त्यावर खासदार प्रतापराव जाधव यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले त्यावर उध्दव ठाकरे गट आक्रमक पहावयास मिळाला चक्क ठाकरे गटाकडून त्या स्मारकाचे गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले त्यावर शिंदे गटाचे खासदार यांनी उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले चक्क आदित्य ठाकरे वर निशाणा साधत पाहिले आदित्य यांच गोमूत्राने शुद्धीकरण करा अस धक्कादायक विधान खासदार जाधव यांनी केलं आहे त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
हे ही वाचा : 'सावरकर इंग्रजांची माफी मागून महिन्याला 60 रुपये...'; राहुल गांधींनंतर आता नाना पटोलेंचं धक्कादायक विधान
तर दुसरी कडे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांनी संबोधून सांगितले होते की खंजीर बाजूला ठेऊन बाळासाहेब यांच दर्शन घ्या. या वक्तव्याचा ही खासदार जाधव यांनी समाचार घेत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत चक्क उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच खंजीर खुपसला असल्याचं विधान केले आहे. आदित्य ठाकरे यांच शुद्धीकरण आणि उद्धव ठाकरे यांनी खंजीर खुपसला खासदार जाधव यांच्या या दोन वादग्रस्त 2 विधानांमुळे पुन्हा जोरदार प्रहार होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री स्मृतीस्थळाचे दर्शन घेताच शुद्धीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरून जातच तिकडे लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आले आणि त्यांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. शिवसेना खासदार अरविंद सावंतही यावेळी स्मृतीस्थळावर उपस्थित होते. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा 10वा स्मृतीदिन आहे.
हे ही वाचा : बाळासाहेबांचा 'ठाकरी बाणा'; हिंदूहृदयसम्राटांच्या गाजलेल्या 'गर्जना'
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर यायच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केली. 'बाळासाहेबांच्या स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं सिव्हील वर्कच काम 50 टक्के पूर्ण झालं आहे. मार्च 2023 आधी हे काम पूर्ण होईल. दुसरा टप्पा महत्त्वाचा असेल, बाळासाहेबांचा राजकीय प्रवास, त्यांची व्यंगचित्र इकडे दाखवली जातील. स्मार लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आग्रही आहोत,' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, Cm eknath shinde, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)