मुंबई, 15 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी हर हर महादेव चित्रपटाच्या मुद्दावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात अडकले. दरम्यान त्यांना याप्रकरणी ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली. या प्रकरणावर पडदा पडतो आहे तोवर आव्हाडांवर दुसरं संकट आल्याने ते पुन्हा अडचणीत आले. आव्हाडांवर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने यावरून राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येतआहे. यासगळ्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावरून अचानक जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिंदे सरकारवर आरोप केले. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणात सरकार दुटप्पी भूमिका निभावत असल्याचे सांगत पोलिसांवर राजकीय दबावाचा वापर केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला या प्रकराणावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माध्यमांना खुलासा केला.
Mumbai, Maharashtra | FIR registered as per the complaint by the lady. Police will conduct the probe and will take necessary action. There will be transparency. There's no political pressure on the police: CM Eknath Shinde on molestation case against NCP's Jitendra Awhad (14.11) pic.twitter.com/r3I5DBv55E
— ANI (@ANI) November 14, 2022
हे ही वाचा : ठाण्यामध्ये शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा, एक कार्यकर्ता जखमी, Video
आव्हाडांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपुर्द केला आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोणतीही कारवाई सूडबुद्धीने होणार नाही. जितेंद्र आव्हाड यांना हे षडयंत्र वाटत असेल तर हे कुणी केलं त्यांना माहिती असेल. राजकीय सूड भावनेने कुठलीही कारवाई नाही हे कायद्याचे राज्य आहे. इथे सगळ्या गोष्टी नियमांच्या आदीन राहून केल्या जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
मागच्या दोन दिवसांपूर्वी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभात विनयभंगाची घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
हे ही वाचा : जळगावात दूध संघ अपहार प्रकरणाला नवे वळण, एकनाथ खडसेंना धक्का
या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.