मुंबई, 07 जून : आपल्या बोलण्याच्या शैलीतून प्रत्येकाचा करेक्ट कार्यक्रम करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (minister jayant patil) यांनी आपल्या पत्निला हटके जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जयंत पाटील यांनी मोजक्याच शब्दात आपल्या पत्निला जन्मदिवसांच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या शैलीत करेक्ट कार्यक्रम केला आहे. पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या सहचारिणीला माझ्या यश-अपयशात, सुख-दुःखात नेहमीच साथ दिलीत, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खांद्याला खांदा लावून माझ्या संगिनी बनलात. शैलजा, (jayant patil wife’s birthday shailaja patil) तुम्ही खऱ्या अर्थाने माझी सहचारिणी ठरलात ! अशा आशयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (birthday celebration)
जयंत पाटील आपल्या बोलण्याच्या स्टाईलने राज्यातील कोणत्याही नेत्याला घायाळ करण्यात माहीर आहेत. दरम्यान सोशल मीडियावर कायम राजकीय सामाजीक पोस्ट टाकणाऱ्या जयंत पाटील यांची आजची पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे. पत्नी शैलजा यांचा आज जन्मदिवस असल्याने त्यांनी फेसबुकवर काही जुने फोटो टाकत शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा होत आहे.
हे ही वाचा : सलमाननंतर अभिनेत्री मलायका आरोराच्या घरी पोलीस दाखल; VIDEO VIRAL काय आहे प्रकरण?
दरम्यान जयंत पाटील सहकुटुंब चारधाम यात्रेतील केदारनाथ, बद्रीनाथच्या दर्शनाला पोहचले आहेत. केदारनाथला महादेवाचे आणि बद्रीनाथला भगवान विष्णूंचे दर्शन घेतले आहे. त्याचे फोटोज त्यांनी ट्वीट करत शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेल्याचे ते म्हणाले.
हर हर महादेव!
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 7, 2022
संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतर्लिंगांपैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेले. pic.twitter.com/FYAk9Alkqq
सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चढाओढ चालली आहे. यामुळे नेतेमंडळी देवाच्या दारी जात आहेत. दुसरीकडे अयोध्या दौऱ्यासाठी संजय राऊत जात असल्याचे समजते आहे. यामुळे देवदर्शन हा चर्चेचा विषय बनत आहे. मात्र, जयंत पाटील यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराला गाजावाजा न करता भेट देत दर्शन घेतले.

)







