मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला ट्रकची धडक, 3 जण जागीच ठार

मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला ट्रकची धडक, 3 जण जागीच ठार

रुग्णवाहिकेमध्ये एकूण 17 लोकं होती. या अपघातात ड्रायव्हरसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 7 जण जखमी झाले आहे.

रुग्णवाहिकेमध्ये एकूण 17 लोकं होती. या अपघातात ड्रायव्हरसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 7 जण जखमी झाले आहे.

रुग्णवाहिकेमध्ये एकूण 17 लोकं होती. या अपघातात ड्रायव्हरसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 7 जण जखमी झाले आहे.

सोलापूर, 14 नोव्हेंबर :  पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज गावाजवळ मिनी बस अपघाताची घटना ताजी असताना  सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ( Solapur-Pune National Highway) एका रुग्णवाहिकेला (Ambulance) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेतील 3 जण जागीच ठार झाले आहे. तर सात जण जखमी झाले आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ही घटना घडली. एका मृतदेहाला घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे.  पुण्यात मृत झालेल्या व्यक्तीला हैद्राबादकडे नेण्यात येत होते. मोहोळ इथं पोहोचल्यानंतर शहरातील कन्या प्रशाळेसमोर रुग्णवाहिकेला अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मालट्रकने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली.

कोरोनामुळे फुफ्फुसांमध्ये होतात रक्ताच्या गुठळ्या, संशोधनातून नवीन माहिती समोर

हा अपघात इतका भीषण होता की, यात रुग्णवाहिकेच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आहे. रुग्णवाहिकेमध्ये एकूण 17 लोकं होती. या अपघातात ड्रायव्हरसह 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात 7 जण जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साताऱ्यात मिनी बस 40 फूट खोल दरीत कोसळली, 6 ठार

तर दुसरीकडे  पुणे बंगलोर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. गोव्याला फिरायला जात असताना काळानं घाला घातला आहे. उंब्रज जवळील तारळी नदीजवळ हा अपघात पहाटेच्या सुमारास झाला आहे.

खासगी ट्रॅव्हल्सनं गोव्याला जात असताना उंब्रज नदीजवळ ही गाडी अचानक कठडा सोडून 40 फूट खोल कोसळली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि 3 वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.

दरम्यान या ठिकाणी अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

First published: