जालना, 27 मे: जालन्यातील (Jalana) एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने हॉस्पिटलची तोडफोड केली. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या (BJP Worker) कार्यकर्त्यानेही तोडफोड करत पोलिसांसोबत बाचाबाची केली होती. त्यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवत या कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्येच काठी तुटेपर्यंत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले असं मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.जालन्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एका अपघातग्रस्त युवकाचा युवकाचा 9 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. यावेळी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत अज्ञात व्यक्तींनी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुडगूस घालून तोडफोड केली होती.
कोविड हॉस्पिटलमध्ये घुसून ICU ची तोडफोड केली, पोलिसांची भाजप कार्यकर्त्याला झोडपले pic.twitter.com/TE38VaLFmK
— News18Lokmat (@News18lokmat) May 27, 2021
विशेष म्हणजे, हे कोविड हॉस्पिटल आहे. या जमावाने हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये घुसून तोडफोड केली होती. त्यामुळे पोलिसांनी जमावाची समजूत काढली, पण परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार केला होता. यात भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाले हा देखील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात 3 ते 4 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
'इंटरनॅशनल क्रश' ठरतोय मराठमोळा नचिकेत लेले, नव्या VIDEOचं चाहत्यांकडून कौतुक
दरम्यान,यावेळी पोलिसांसोबत शिवराज नारियलवाले याने बाचाबाची केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये शिवराजला काठ्याने बेदम चोप दिला. पोलिसांच्या हातातील दोन काठ्या तुटून गेल्या. तरीही त्याला लाथा बुक्याने मारहाण करण्यात आली. अखेर ज्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली होती, त्याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मध्यस्थी करून शिवराजला वाचवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
BJP worker Shivram who made this video viral was also mercilessly beaten by cops at Jalna, Maharashtra. Local BJP unit has filed a complaint against the cops. Wrring cops should be punished. https://t.co/NFjiRnUsv4 pic.twitter.com/TkntOg64t6
— Jiten Gajaria (@jitengajaria) May 27, 2021
तर दुसरीकडे शिवराजने आपण तोडफोड केली नसल्याचा दावा केला आहे.पोलिसांनी मात्र, तोडफोड करण्यात शिवराज होता, असं म्हणत गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Jalgaon, Maharashtra, Mumbai