मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'इंटरनॅशनल क्रश' ठरतोय मराठमोळा नचिकेत लेले, नव्या VIDEOचं चाहत्यांकडून कौतुक

'इंटरनॅशनल क्रश' ठरतोय मराठमोळा नचिकेत लेले, नव्या VIDEOचं चाहत्यांकडून कौतुक

 ‘इंडियन आयडॉल 12’(Indian Idol 12)  फेम नचिकेत लेले(Nachiket Lele)  आपल्या सिंगिंगमुळे नेहमीच चर्चेत असतो.

‘इंडियन आयडॉल 12’(Indian Idol 12) फेम नचिकेत लेले(Nachiket Lele) आपल्या सिंगिंगमुळे नेहमीच चर्चेत असतो.

‘इंडियन आयडॉल 12’(Indian Idol 12) फेम नचिकेत लेले(Nachiket Lele) आपल्या सिंगिंगमुळे नेहमीच चर्चेत असतो.

मुंबई, 27 मे: इंडियन आयडॉल 12 (Indian Idol 12)  फेम नचिकेत लेले (Nachiket Lele) आपल्या गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. नचिकेतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video)  होतं आहे. यामध्ये तो ‘लाईफ इन ए मेट्रो’ चित्रपटातील ‘ओह मेरी जान’ हे गाणं गात आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

‘इंडियन आयडॉल 12’ मध्ये मराठमोळ्या नचिकेत लेलेने आपल्या आवाजाने सर्वांनांचं वेड लागलं होतं. मात्र दोन महिन्यांपूर्वी तो शोमधून बाहेर झाला होता. त्यामुळे चाहते भयंकर संतापले होते. चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला होता. तसेच शो मेकर्सवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

मूळचा कल्याणचा असणाऱ्या नचिकेत लेलेने आपल्या आवाजाने सर्वांवर जादू केला आहे. सध्या नचिकेत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. तो सतत आपल्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतो. आणि या व्हिडीओनां चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत असते. चाहते यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

(हे वाचा: ना आभूषणं, ना मेकअप; तरुणींनाही लाजवेल असं 'श्रीमंताघरची सून'च्या सासूचं सौंदर्य )

नुकताच नचिकेत लेलेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये तो एकदम रॉक अंदाजात दिसत आहे. तर तो ‘लाईफ इन ए मेट्रो’ या चित्रपटातील ‘ओह मेरी जान’ हे गाणं म्हणत आहे. त्याच्या या रॉक अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

(हे वाचा: चाहत्यानं घातली शाहरुखच्या मुलीला मागणी; महिन्याला कमावतो इतके लाख रुपये)

या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून नचिकेतचं कौतुक करत आहेत. तसेच काही लोक नचिकेत लेलेच्या लुकचं देखील कौतुक करत आहेत. कित्येकांनी कमेंट करत नचिकेतला ‘इंटरनेशनल क्रश’ म्हटलं आहे, शोमधून बाहेर होऊनदेखील नचिकेतची जादू कायम आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Indian idol