मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Jalgaon Rape Case : अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने महिलेला पेटवले, जळगावात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा

Jalgaon Rape Case : अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने महिलेला पेटवले, जळगावात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा

जळगाव जिल्ह्यात अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने महिलेला पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जळगाव जिल्ह्यात अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने महिलेला पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जळगाव जिल्ह्यात अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने महिलेला पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

जळगाव, 25 नोव्हेंबर : जळगाव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने महिलेला पेटवून देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगावमध्ये ही घडना घडली असून या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान यामुळे जळगाव जिल्ह्यातील महिल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचे धाक संपल्याने असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव शहरातील एका भागात राहणारी महिला ही तिच्या भावाकडे जाण्यास निघाली होती. रहदारी असलेल्या भागातून जाताना एका पन्नास वर्षीय अनोळखी पुरुषाने विवाहितेचा हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : भावासोबत झालेल्या भांडणाचा राग चिमुकल्यावर काढला; नाशिकच्या आश्रमशाळेतील हत्येचं गूढ उकललं

दरम्यान या महिलेने विरोध करताच सदर व्यक्तीने महिलेला पेटवून देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित महिला ही जखमी झाली असून महिलेला तातडीने औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती ठीक असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिली आहे.

दरम्यान याप्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दिवसा असे प्रकार घडत असतील तर महिलांनी एकट्याने फिरावे की नाही अशा संतप्त प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या. तसेच जळगावात अशा दिवसेंदिवस घटना वाढत असल्याने जळगावात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : लग्नाच्या वाढदिवशी पत्नी वाट बघत होती, पण पती परतलाच नाही; भाजप नगसेवकासोबत घडलं भयानक

दरम्यान घडेल्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

First published:

Tags: Crime news, Jalgaon, Rape, Rape case, Rape news