जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लग्नाच्या वाढदिवशी पत्नी वाट बघत होती, पण पती परतलाच नाही; भाजप नगसेवकासोबत घडलं भयानक

लग्नाच्या वाढदिवशी पत्नी वाट बघत होती, पण पती परतलाच नाही; भाजप नगसेवकासोबत घडलं भयानक

डावीकडे मृत नगसेवक

डावीकडे मृत नगसेवक

बुधवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे नगरसेवक शैलू यांनी केक आणला होता.

  • -MIN READ Gwalior,Madhya Pradesh
  • Last Updated :

ग्वाल्हेर, 25 नोव्हेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. दिवसेंदिवस हत्येच्या घटनाही समोर येत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एकीकडे पत्नी घरी वाट पाहत असतानाच लग्नाच्या वाढदिवसादिवशीच एका नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही हृदयद्रावक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली आहे. येथे भाजपचे नगरसेवक शैलेंद्र कुशवाह उर्फ ​​शैलू यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. शैलू मुरार हे कॅन्टोन्मेंट प्रभागाचे नगरसेवक होते. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच त्यांच्या मित्रांनी त्यांचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर या घटनेनंतर आरोपींची घरे पाडण्याच्या मागणीसह नगरसेवकाच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. भाजपचे नगरसेवक शैलेंद्र कुशवाह उर्फ ​​शैलू यांची बुधवारी रात्री त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच हत्या करण्यात आली. पत्नीला केक आणि मुलांना खाऊ देऊन शैलू रात्री मित्रांसोबत बाहेर पडले होते. यानंतर रात्री उशिरा त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. या हत्याकांडाचा 13 सेकंदांचा लाइव्ह व्हिडिओही समोर आला आहे. मृत नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे नेता होते आणि ते मुरार कॅन्टोन्मेंट भागातील प्रभाग क्रमांक तीनचे नगरसेवक होते. तसेच मृत नगरसेवक हे राज्यमंत्री भरतसिंह कुशवाह यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. हेही वाचा -  7 तास आफताबला विचारले गेले हे प्रश्न; पॉलिग्राफ टेस्ट उलगडणार श्रद्धा हत्याकांडाची संपूर्ण कहाणी? पत्नी केक कापण्यासाठी थांबली - शैलूची पत्नी राधा कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. नगरसेवक शैलू यांनी केक आणला होता. राजेश शर्मा त्यांच्यासोबत होते. मुलांसाठी काहीतरी खायला आणू असे सांगून ते घरातून निघून गेले. नंतर जेवण देऊन निघून गेले. ते म्हणाले, मी थोड्या वेळाने येतो. मात्र, पुन्हा परतले नाही. काही लोकांनी त्याला काठ्यांनी मारहाण केल्याने रात्री अडीचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणातील हत्येचा आरोप त्यांच्या मित्रावर लावण्यात आला आहे. नगरसेवक शैलू कुशवाह यांचा मित्र विकीचा बुधवारी वाढदिवस होता. विकीने बुधवारी रात्री उशिरा पार्टी आयोजित केली होती. नगरसेवकाची पत्नी राधा यांनी सांगितले की, आरोपी पती शैलूला सोबत घेऊन गेला. रात्री उशिरापर्यंत शैलू घरी परतला नाही. रात्री अडीच वाजता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी मिळाली. राजेश शर्मा सकाळपासून पती शैलूसोबत होता, अशी माहितीही मृत नगरसेवकाच्या पत्नीने दिली आहे. तीन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते - शैलूचे तीन महिन्यांपूर्वी भुरा तोमरसोबत भांडण झाले होते. तेव्हापासून त्याचा भुराशी संवाद बंद होता. दोन दिवसांपूर्वी शैलूने भुराशी बोलणे सुरू केले. पत्नी राधा कुशवाहाने सांगितले की, ती तिच्या पतीची वाढदिवसाचा केक कापण्यासाठी वाट पाहत होती. बुधवारी रात्री 11.30 वाजता शैलूशी फोनवर बोलेपर्यंत सर्व काही ठीक होते. फोन केल्यावर शैलू म्हणाले की, मी थोड्या वेळाने येतोय. ते अनेकदा रात्री 12 वाजल्यानंतरच घरी यायचे. म्हणूनच जास्त काळजी करू नका. मात्र, रात्री 12.30 वाजता वंशीपुरा चौकात राज उर्फ ​​राजेश शर्मा, भुरा उर्फ ​​सर्वेश तोमर, विकी कौशल, विनीत राजावत आणि धीरज पाल नगरसेवकाला लाठ्या-रॉडने मारहाण करत असल्याची माहिती मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात