मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सासू-सुनेचा वाद विकोपाला; विळ्याने गळा कापून सासूची हत्या

सासू-सुनेचा वाद विकोपाला; विळ्याने गळा कापून सासूची हत्या

जळगाव जिल्ह्यात सुनेने सासूची गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

जळगाव जिल्ह्यात सुनेने सासूची गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

जळगाव जिल्ह्यात सुनेने सासूची गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे

  • Published by:  Sunil Desale
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव, 2 जून: सासू आणि सुनेत वाद होतच असतात मात्र, जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) अशी एक घटना उघडकीस आली आहे ज्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला आहे. सुनेने सासूची हत्या (murder) केल्याची धक्कादायक बुधवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गजानन महाराज नगर भागात सुनेने सासूच्या डोक्यात आणि पाठीवर विळा मारला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा मृत्यू झाला आहे. द्वारकाबाई सोनवणे वय 75 असे हत्या करण्यात आलेल्या वृद्ध सासूचे नाव आहे. भुसावळ शहरातील गजानन महाराज नगरमधील पद्माबाई विद्यालय येथे गेल्या 8 वर्षांपासून सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे आणि त्यांचा परिवार राहत आहे. बुधवारी रवींद्र सोनवणे हा बाहेर गेलेला असताना सासू द्वारकाबाई आणि सुन उज्वला यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की सुनेने सासूची हत्या केली. लग्नानंतर तिसऱ्या महिन्यातच पत्नीची हत्या; रात्रभर मृतदेहाशेजारी बसून होता आरोपी उज्वला रविंद्र सोनवणे यांचा आपल्या सासू द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात वाद झाला तो विकोपास गेला. त्यात सुनेने धारदार शस्त्र विळ्याने सासू द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आणि प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी धाव घेतली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime, Jalgaon, Murder

पुढील बातम्या