Home /News /maharashtra /

Jalgaon Crime: तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून मित्राचीच हत्या, CCTV मुळे हत्येचं गूढ उकललं

Jalgaon Crime: तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून मित्राचीच हत्या, CCTV मुळे हत्येचं गूढ उकललं

मित्रांनीच केली मित्राची हत्या, इमारतीवरुन ढकलतानाचा CCTV समोर आल्याने हत्येचं गूढ उकललं

मित्रांनीच केली मित्राची हत्या, इमारतीवरुन ढकलतानाचा CCTV समोर आल्याने हत्येचं गूढ उकललं

Jalgaon Crime News: इमारतीवरुन खाली पडल्याने तरुणाच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं असून आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 12 मे : जळगाव शहरातील (Jalgaon City) गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून मुकेश रमेश राजपूत (Mukesh Ramesh Rajput) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती. पण आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुकेश याचा पडून नव्हे तिसऱ्या मजल्यावरून ढकलून खून केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी शहर पोलिसांनी बुधवारी तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Caught in CCTV, youth pushed from third floor of building) अमर उर्फ लखन शांताराम बारोट, पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे आणि निखिल राजेश सोनवणे अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. शहरातील खाऊ गल्लीत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर कामाला होता. सोमवारी काम आटोपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. अमर ऊर्फ लखन व पराग ऊर्फ बबलू या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असे सांगत घरुन बोलावले. त्यानंतर दाणाबाजातून बिर्यानी आणि दारू घेतल्यानंतर तिघेही दारु पिण्यासाठी गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर गेले. याठिकाणी दारु पिता अमर आणि पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. हमरीतुमरी झाल्यावर दोघांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला होता. वाचा : पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरण; रुबी हॉल क्लिनिकच्या डॉ. परवेज ग्रँटसह 15 जणांवर गुन्हा दाखल मुकेश खाली पडल्यानंतर अमर आणि पराग हे दोघेही स्वतः पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी मुकेश हा तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. याप्रकरणी सीएमओ डॉ. अजय सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी दुपारी मुकेशच्या नातेवाईकांनी त्याचा अपघात नसून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी गोलाणी मार्केट येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यावेळी एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुकेशला दोन जण ढकलून देत असल्याचे कैद झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अमर ऊर्फ लखन आणि पराग ऊर्फ बबलू या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Cctv, Crime, Jalgaon, Murder

    पुढील बातम्या