मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Bodvad Nagar Panchayat Election: एकनाथ खडसेंना होमग्राऊंडवर झटका, शिवसेनेने एकहाती मिळवली सत्ता

Bodvad Nagar Panchayat Election: एकनाथ खडसेंना होमग्राऊंडवर झटका, शिवसेनेने एकहाती मिळवली सत्ता

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. जळगावातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 जागांवर विजय मिळवता आला आहे तर शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. (Jalgaon Bodvad Nagar Panchayat Election result)

पुढे वाचा ...

जळगाव, 19 जानेवारी : नगरपंचायत निवडणुकीचे निकाल (Nagar Panchayat Election) जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) बाजी मारली असली तरी जळगावात त्यांना एक धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या (Shiv Sena wins maximum seats in Bodvad Nagar Panchayat) आहेत. त्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हा एक मोठा धक्का आहे. 17 जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक म्हणजेच 9 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे आता बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.

एकनाथ खडसेंना मोठा धक्का

बोदवड नगरपंचायतीसाठी सुरू असलेल्या मतदानाची मोजणी सकाळी दहा वाजता सुरू झाली. पहिल्‍या फेरीपासून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी ठेवली होती. बोदवडमध्‍ये सत्‍ता असलेल्‍या भाजपला मात्र केवळ खाते उघडता आले आहे. मात्र मुक्‍ताईनगर मतदार संघ असलेल्‍या चंद्रकांत पाटील यांच्‍या उमेदवारांनी नंतरच्‍या फेरींमध्‍ये बाजी पलटवली. यात राष्‍ट्रवादी काँग्रेसला मागे टाकत शिवसेना पुढे गेली आहे.

बीडमध्ये भाजपची सत्ता; पंकजा ताईंचा राष्ट्रवादीला धक्का, निकालानंतर धनंजय मुंडेंना लगावला सणसणीत टोला

बोदवड नगरपंचायतीच्‍या आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार 17 पैकी राष्ट्रवादीला केवळ 7 जागांवर विजय मिळविता आला आहे. विशेष म्‍हणजे राष्ट्रवादीने 17 पैकी 17 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. परंतु, शिवसेनेने आतापर्यंतच्‍या निकालात मुसंडी मारल्‍याने एकनाथ खडसेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर धक्का बसल्‍याचे चित्र सध्‍यातरी आहे.

बोदवड नगरपंचायत एकुण जागा-17

भाजप - एका जागेवर विजय

शिवसेना - 9 जागांवर विजय

काँग्रेस - 0

राष्ट्रवादी - 7 जागांवर विजय

इतर (अपक्ष) - 0

भाजप पहिला क्रमांकाचा पक्ष, तरीही...

राज्यातील 32 जिल्ह्यांच्या 106 नगरपंचायतींमधील 1802 जागांचा निकाल आज समोर येतोय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजप हा या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाच पक्ष ठरताना दिसतोय. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा नंबर लागतोय. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला सर्वाधिक 379 जागांवर यश आलेलं आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला 359, शिवसेनेला 297, काँग्रेसला 281 आणि इतर 253 जागांवर विजय मिळाल्याचं चित्र आहे.

दापोलीत रामदास कदमांना मोठा धक्का

दापोली नगरपंचायत निवडणुकीत (Dapoli Nagar Panchayat Election) रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या गटाची सरशी झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वादात दापोली नगरपंचायत अतिशय अटीतटीची बनली होती. या नगरपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब विरुद्ध माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Former Minister Ramdas Kadam) यांची या निवडणुकीत ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती, दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे या नगरपंचायतीचे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

First published:

Tags: BJP, Eknath khadse, Election, Jalgaon, Shiv sena