Home /News /maharashtra /

Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात, दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident: जळगावात भीषण अपघात, दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू

जळगावात दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू

जळगावात दूध टँकर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू

Jalgaon Accident news: जळगावात एक भीषण अपघात झाला आहे. दूध टँकर आणि ट्रकमध्ये झालेल्या जोरदार धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळगाव, 13 मे : जळगाव जिल्ह्यात एक भीषण अपघात (major accident in Jalgaon) झाला आहे. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध (Milk Tanker) टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार (5 people died on the spot) झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव जवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले. यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. यानुसार दुध शिफ्ट करण्याचे काम सुरू असतांना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांने दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. वाचा : स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह हे मुक्ताईनगरच्या उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान अद्यापपर्यंत मयतांची नावे कळू शककेली नाहीत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घोडसगाव येथील पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मुक्ताईनगर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. उत्तरप्रदेशात भीषण अपघात, पुण्यातील चौघांचा जागीच मृत्यू उत्तरप्रदेशात यमुना एक्सप्रेस वे वर एक भीषण अपघात झाला आहे. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो आणि डम्पर यांच्यात धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो गाडीतील सात पैकी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Accident, Jalgaon

पुढील बातम्या