मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुराच्या पाण्यात जाण्याचा अतिउत्साहीपणा भावंडाना भोवला, वाहून गेलेल्या एकाला वाचवण्यात यश पण..

पुराच्या पाण्यात जाण्याचा अतिउत्साहीपणा भावंडाना भोवला, वाहून गेलेल्या एकाला वाचवण्यात यश पण..

राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी बाहेर न पडण्याचं आवाहन वेळोवेळी केलं जातं, मात्र जालनामध्ये असाच अतिउत्साहीपणा दोन भावंडांना भोवला आहे.

जालना, 17 जून: संपूर्ण राज्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर अनेक ठिकाणी पावसानं (Maharashtra Rains) झोडपून काढलं आहे. मागच्या आठवड्यात मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला (Monsoon in Maharashtra) व्यापलं असून अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग अद्यापही सुरुच आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी बाहेर न पडण्याचं आवाहन वेळोवेळी केलं जातं, मात्र जालनामध्ये असाच अतिउत्साहीपणा दोन भावंडांना भोवला आहे.

जालनामधील भोकरदन (Bhokardan) परिसरात बुधवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना अक्षरशः पूर (Flood Situation in Bhokardan Area) आला होता.  दरम्यान, पुराच्या पाण्यातून जाण्याचा अतिउत्साहीपणा दोन चुलत भावंडाना चांगलाच नडला आणि दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. सय्यद शयाद सईद (19) आणि सय्यद सलीम सईद (21) अशी या भावंडांची नावे आहेत. सय्यद सलीम सईद याला वाचविण्यात यश आलं असलं तरी सय्यद शयाद सईद याचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला. सय्यद शयाद सईद आणि सय्यद सलीम सईद या दोघांबाबत घडलेल्या प्रसंगामुळे परिसरात दु:ख व्यक्त केलं जात आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात जाण्याचा अट्टहास केला नसता तर सय्यद शयाद सईदचे प्राण वाचले असते अशी प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहे.

हे वाचा-ये रातें, ये मौसम, नदी का किनारा... गाणं सुसाइड नोटमध्ये लिहून तरुणाची आत्महत्या

भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) चांगलाच व्हायरल होतो आहे. त्यांच्या आजुबाजूला उपस्थित असणाऱ्या काहींनी हा व्हिडीओ शूट केला आहे. त्यांनाही एका क्षणात काय घडलं याचा अंदाज आला नाही. वाहून गेलेल्या एकाला वाचवण्यात यश आलं असून दुसऱ्या भावाचा मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Maharashtra News, Rain flood