कानपूर, 16 जून : नोकरी लावून देतो असे सांगून नंतर फसवणूक झालेल्या युवकाने तणावात येवून गळफास (Youth Suicide) लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या युवकाने कर्ज घेऊन नोकरीसाठी 9 लाख रुपयांची व्यवस्था केली होती. मात्र, सावकाराने पैसे परत न केल्याने त्याला त्रास द्यायला सुरू केला, यामुळे तरुणाने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली.
दोन पानांच्या सुसाईड नोटमध्ये (Suicide Note) या युवकाने 'यह रातें, यह मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा' असं हिंदी गाणं सुरुवातीला लिहलं होतं. त्यानंतर चिठ्ठीमध्ये राजकिशोर नावाच्या व्यक्तीचे नाव आहे, या व्यक्तीने नोकरी लावून देण्यासाठी साडेतीन लाख रुपये आपल्याकडून घेतले होते. पत्नी माया हिनं देखील आपल्याला बोलण्यात फसवून तीन लाख रुपये घेतले होते, असं लिहलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहे.
तर अरविंद नावाच्या आणखीन एका व्यक्तीनं कल्याण विभागात नोकरी लावण्याच्या नावाखाली त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतले होते. तसेच एक जवळचा मित्र सूरज गंगवारचा भाऊ आणि वहिनीकडून पाच लाख उसने घेतले होते. मात्र त्याची परतफे करणे लवकर शक्य नसल्यामुळे त्यांनी पोलिसांची भीती दाखवून संपूर्ण कुटुंबाला धमक्या देण्यास सुरुवात केली होती. त्याची चारचाकी गाडीही ते घेऊन गेले. ही सर्व हकीकत त्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिली असून त्यानं बाराबंकीचे राजकिशोर, माया, अरविंद, लोकेश आणि मजहर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मृत यतींद्र तिवारी कल्याणपूरमधील सत्यम विहार येथे भाड्याच्या घरात राहत होते. तो गुटखा-सिगारेटचे दुकान चालवून कुटुंबाचा सांभाळ करीत होता. सुमारे आठवडाभरापूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली होती. दोन दिवसांपासून घराचा दरवाजा कोणीच उघडत नसल्याचे पाहुन घरमालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
यतींद्रच्या पोस्टमार्टम अहवालात अद्याप मृत्यूचे कोणतेही स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, या घटनेला आता 24 तास उलटून गेले तरी अद्याप कुटुंबीयांनी कोणाविरोधातही तक्रार दिलेली नाही.
हे वाचा -
30 वर्षे नोकरी केल्यानंतर शिक्षणाची धरली कास; पुण्यातील 56 वर्षीय विद्यार्थिनीनं पटकावली 4 सुवर्ण पदकं
याबाबत पश्चिम कानपूरचे डीसीपी संजीव त्यागी म्हणाले की, पोलिसांना संशयास्पद अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. त्याचे पोस्टमॉर्टम केले आहे. कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.