जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ranji Trophy : मुंबईचा संकटमोचक, क्वार्टर फायनलनंतर सेमी फायनलमध्येही 'यशस्वी' शतक, टीमला सावरलं!

Ranji Trophy : मुंबईचा संकटमोचक, क्वार्टर फायनलनंतर सेमी फायनलमध्येही 'यशस्वी' शतक, टीमला सावरलं!

Ranji Trophy : मुंबईचा संकटमोचक, क्वार्टर फायनलनंतर सेमी फायनलमध्येही 'यशस्वी' शतक, टीमला सावरलं!

एकीकडे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सीरिज खेळत असतानाच दुसरीकडे रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामनेही सुरू आहेत. मुंबई आणि उत्तर प्रदेश (Mumbai vs Uttar Pradesh) यांच्यात बँगलोरमध्ये दुसरी सेमी फायनल खेळवली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : एकीकडे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सीरिज खेळत असतानाच दुसरीकडे रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामनेही सुरू आहेत. मुंबई आणि उत्तर प्रदेश (Mumbai vs Uttar Pradesh) यांच्यात बँगलोरमध्ये दुसरी सेमी फायनल खेळवली जात आहे. उत्तर प्रदेशने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर तिसऱ्याच बॉलवर यश दयाळने मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉला आऊट केलं. 3 बॉलमध्ये शून्य रनवर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) माघारी परतला. यानंतर शिवम मावीने अरमान जाफरला 10 रनवर आऊट केलं. 24 रनवर 2 विकेट गमावल्यानंतर मुंबईची टीम अडचणीत सापडली, पण मुंबईचा ओपनर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) क्वार्टर फायनलचा हिरो सुवेद पारकरसोबत मुंबईची इनिंग सावरली. पारकरने उत्तराखंडविरुद्धच्या क्वार्टर फायनलमधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, आपल्या पहिल्याच सामन्या द्विशतक ठोकून त्याने इतिहास घडवला होता. यशस्वीची लागोपाठ 2 शतकं सुवेदची बॅटिंग बघून तो सेमी फायनलमध्येही क्वार्टर फायनलसारखीच कामगिरी करेल, असं वाटत होतं, पण तो 32 रनवर आऊट झाला. यश दयाळनेच सुवेदची विकेट घेतली. सुवेद आऊट झाला तेव्हा मुंबईचा स्कोअर 87 रन होता, यानंतर यशस्वीने सरफराज खानच्या मदतीने मुंबईला संकटातून बाहेर काढलं. यशस्वीने क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंडविरुद्ध 103 रनची खेळी केली होती. रणजी ट्रॉफीमधलं हे त्याचं पहिलंच शतक होतं. यानंतर आता सेमी फायनलमध्येही तो शतक करून आऊट झाला. 227 बॉलमध्ये 100 रन करून यशस्वी माघारी परतला. करण शर्माने यशस्वी जयस्वालला आऊट केलं. यशस्वीला मिळाली दोन जीवनदान या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वालला 2 जीवनदान मिळाली. 33 रनवर असताना अंकित राजपूतच्या बॉलिंगवर विकेट कीपर ध्रुव जुरेलने यशस्वीचा कॅच सोडला. यानंतर अंकितच्याच बॉलिंगवर यशस्वीच्या बॅटच्या एजला बॉल लागला, पण रिंकू सिंगला कॅच पकडता आला नाही. या दोन्ही जीवदानाचा यशस्वीने फायदा उचलला आणि आपलं शतक पूर्ण केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात