पुणे, 11 मे: घरकाम करणाऱ्या एका महिलेनं ज्या ठिकाणी काम करतो, त्याच घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याची (Ornaments theft) घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दागिने चोरून नेणाऱ्या मोलकरणीसह दागिने विकत घेणाऱ्या कारागिराला अटक (Maid and artison arrest) केली आहे. दररोज घरकाम करण्यासाठी येणारी महिला अचानक बंद का झाली? या संशयातून फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीनं घरातील दागिने आणि पैशाची तपासणी केली. तेव्हा घरातील चार लाख रुपये किंमतीचे दागिने (4 lac worth ornaments theft) गायब झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यामुळे फिर्यादीनं पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत खऱ्या भामट्यांना गजाआड केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय सुनीता लष्करे आणि 38 वर्षीय कारागीर खालिद सय्यद उर्फ बच्चू यांना अटक केली आहे. आरोपी मोलकरीण महिला येरवडा परिसरातली वडार वस्तीतील रहिवासी आहे. ती मागील काही महिन्यांपासून 33 वर्षीय फिर्यादी संदीप कुलदीपकुमार ठुसू यांच्या घरी घरकाम करण्यासाठी येत होती. मात्र काही दिवसांपासून तिनं अचानक कामावर जाणं बंद केलं. संबंधित महिलेनं अचानक कामावर येणं बंद का केलं? यावरून फिर्यादी पती-पत्नींमध्ये संशय बळावला. घरातील मौल्यवान वस्तू आणि पैशांची तपासणी त्यांनी केली. तेव्हा घरातील 4 लाख रुपये गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. पण आरोपी महिलेनं सुरुवातील उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिने चोरलेल्या दागिन्यांपैकी एक जोड सोन्याचे कानातील झुमके, एक सोन्याची अंगठी आणि काही चांदीची नाणी जप्त केली आहेत. हे ही वाचा- Covid-19च्या काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, कोरोना रुग्णांना करतायेत लक्ष्य तर उर्वरित सोनं तिने खालिद सय्यद नावाच्या एका कारागिराला विकलं होतं. पोलिसांनी आरोपी खालीद याच्याकडूनही चोरलेले सर्व दागिने जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







