जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 16 वर, आजचे बचावकार्य थांबवले

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 16 वर, आजचे बचावकार्य थांबवले

76 गावांना भूस्खलनचा धोका (प्रतिकात्मक फोटो)

76 गावांना भूस्खलनचा धोका (प्रतिकात्मक फोटो)

Irshalwadi Landslide update : निसर्गाच्या खुशीत वसलेलं इर्शाळवाडीवर अस्मानी संकट कोसळलं. बुधवारी, रात्री गाढ झोपेत असलेल्या या गावावर दरड कोसळली.

  • -MIN READ Raigad,Maharashtra
  • Last Updated :

इर्शाळवाडी, 20 जुलै : निसर्गाच्या खुशीत वसलेलं इर्शाळवाडीवर अस्मानी संकट कोसळलं. बुधवारी, रात्री गाढ झोपेत असलेल्या या गावावर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचे मृतदेह सापडले आहे. तर 21 जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. घटनास्थळावर पाऊस सुरू असल्यामुळे आजचं मदतकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी पुन्हा मदतकार्य सुरू होणार आहे. इर्शाळवाडी ही इर्शाळगडामुळेच प्रसिद्ध आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेली इर्शाळवाडीमध्ये 50 ते 60 घरांची ही वस्ती आहे. बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास इथं दरड कोसळली आणि संपूर्ण वाडी ही ढिगाराखाली गाडली गेली आहे. अजूनही घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, यांच्यासह इतर मंत्र्यांनी भेट दिली. दुपारपर्यंत 103 जणांची ओळख पटली. तर 93 जणांना वाचवण्यात आलं आहे. पावसामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचण येत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

याठिकाणी जाण्यासाठी माणवली या गावातून चालत जावं लागतं. तीव्र उतारावर वस्ती असल्यानं तिथं पोहोचणं कठीण आहे. ठाकर नावाचे आदिवासी समाजाचे लोक या वाडीत राहतात. दरड कोसळण्याची घटना ही बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. यात 50 ते 60 कुटुंब बाधित झाल्याची माहिती आहे. यातील 21 जखमी असून 17 लोकांवर बेस कॅम्पवर उपचार तर 7 लोकांवर एमजीएम येथे उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे घटनास्थळी मुक्कामी दरम्यान, गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर वरती चढून प्रत्यक्ष उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वत: बचाव कार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले. विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत: बचाव कार्यात झोकून दिले. (Irshalwadi Landslide : रेस्क्यू ऑपरेशन करणंही कठीण, अशी आहे इर्शाळवाडीतील सध्याची भयानक परिस्थिती) एरवी पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅण्ट परिधान केलेले मुख्यमंत्री आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इर्शाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले. मी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:ला सामान्य कार्यकर्ताच समजतो, असे नेहमी मुख्यमंत्री भाषणांमधून सांगत असतात. त्याचा प्रत्यय आज सर्वांना आला. अपघात असो..आपत्ती येवो..वैद्यकीय मदत असो सामान्यांच्या मदतीसाठी सदैव ‘ऑन फिल्ड’ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्यांसाठी असणारी तळमळ आज पुन्हा एकदा दिसून आली. प्रतिकुल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती हे पाहून सकाळी साडेसात पासून ‘ऑनफिल्ड’ असलेल्या मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्ता अस्वस्थ होता. डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष मदत केली पाहिजे नागरिकांना बाहेर काढले पाहिजे असे ते सोबतच्या मंत्र्यांना देखील सांगत होते. इर्शाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सुचना देऊन तेथून निघाले नाही. त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री इर्शालगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले. ( Irshalwadi Landslide : शांत हो! मी माणूस पाठवतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दुर्घटनाग्रस्तांना दिला धीर ) केंद्रिय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसारीतल सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय काय करता येईल ते पहात होते. मदत कार्याला वेग येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.एकीकडे प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभागी होतांना मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील पिडितांचे अश्रु पुसण्याचे काम केले, त्यांना दिलासा दिला. जिल्हा प्रशासनाला पिडितांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था, निवासाची सोय, भोजन याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात