जळगाव 30 ऑक्टोबर : जळगावात शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. पाणीपुरवठ्याच्या कामावरुन चिमणराव पाटील नाराज झाले आहेत. चिमणराव यांनी आपल्याच मंत्र्यावर निशाणा साधत आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता गुलाबराव पाटलांनीही चिमणरावांना प्रत्युत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटलांनी सुनावले फडणवीसांच्या ‘खास’ माणसाला, ‘ही’ 40 आमदारांची बदनामी’! गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की ‘एकमेकांबरोबर नारळ फोडल्याने जर पक्षाला बळ मिळत असेल तर पारोळा मार्केट कमिटीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उमेदवारांना चिमणराव पाटील बिनविरोध करत राष्ट्रवादीशी आय लव यू करतात तेव्हा त्यांचं बळ कुठे जातं?’ असा जोरदार पलटवार गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटलांवर केला आहे. पुढे ते म्हणाले, की ‘चिमणराव पाटील यांना मीच शिवसेनेत आणलं. माझ्या जुन्या मतदारसंघात ते आमदार झाले त्यावेळी त्यांना घेऊन मी मतदारसंघात फिरलो तेव्हा मात्र कधीही आमच्यात कटूता नव्हती. मात्र एखाद्या नारळ फोडण्यावरून जर राष्ट्रवादीला बळ मिळत असेल तर मी रोज फोडेल अशी टीकाही गुलाबराव पाटील यांनी केली आहे. या आरोप प्रत्यारोपामुळे शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांचा वाद हा चव्हाट्यावर आला असून दोघांमधील संघर्ष शिगेवर पोहोचला आहे. कैलास पाटलांना उपोषण सोडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांचा फोन; चर्चेनंतर पाटील म्हणाले.. या कारणामुळे चिमणराव पाटील नाराज - पारोळा एरंडोल मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या मुलाला पाणीपुरवठ्याचे काम दिले. या कामाचे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या हस्ते नारळ फोडून केल्याने चिमणराव पाटील यांनी गुलाबराव पाटलांवर नाराजी व्यक्त केली. तुम्ही मंत्री झाला म्हणून सरकार तुमची खाजगी मालमत्ता नाही अशी टीका त्यांनी गुलाबराव पाटलांवर केली होती. या टिकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







