जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: फुलांची माळ धरू मद्यपी भरभर वर चढला अन् डोक्याने फोडली हंडी, गोविंदाही चक्रावले

VIDEO: फुलांची माळ धरू मद्यपी भरभर वर चढला अन् डोक्याने फोडली हंडी, गोविंदाही चक्रावले

VIDEO: फुलांची माळ धरू मद्यपी भरभर वर चढला अन् डोक्याने फोडली हंडी, गोविंदाही चक्रावले

दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा तयारी करत होते. मात्र इतक्यात गर्दीमध्ये एक युवक त्या दोरीपर्यंत पोहोचला, जिथे दहीहंडी बांधली होती. यानंतर या दोरीवरुनच पुढे सरकत त्याने हवेतच दहीहंडी फोडली (Dahi Handi Video)

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे 20 ऑगस्ट : शुक्रवारी देशभरात मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा झाला. अनेक ठिकाणी गोविंदांनी थर रचत दहीहंडी फोडली. मात्र, यादरम्यान काही विचित्र घटनाही समोर आल्या. अशीच एक घटना उल्हासनगरमधूनही समोर आली. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की गोविंदाच ही दहीहंडी फोडतात. मात्र, उल्हासनगरमध्ये अतिशय अजब दृश्य पाहायला मिळालं. Ajit Pawar : अजित पवार म्हणतात महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष, गोविंदाना आरक्षण देताना काय क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार? याठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा तयारी करत होते. मात्र इतक्यात गर्दीमध्ये एक युवक त्या दोरीपर्यंत पोहोचला, जिथे दहीहंडी बांधली होती. यानंतर या दोरीवरुनच पुढे सरकत त्याने हवेतच दहीहंडी फोडली. हे पाहून तिथे उपस्थित सगळेच चक्रावले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती नशेत होता. नशेत त्याने दोरीवर चढून थेट दहीहंडीच फोडली. त्यामुळे गोविंदांची सगळी मेहनत वाया गेली. या अजब घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

दरम्यान या प्रकरणातील दहीहंडी फोडणाऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. भोला वाघमारे असं त्याचं नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. भोलाने उंचावर असलेली दहीहंडी दोरीवर लटकत आणि सरपटत येत डोक्याने फोडली होती. दारूच्या नशेत असलेल्या भोलाने गोविंदांऐवजी स्वतःच दहीहंडी फोडली. आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी; गोविंदा जखमी, काय घडलं? ही घटना जय भवानी मित्र मंडळांच्या दहीहंडी कार्यक्रमात घडली. शिंदे गटाच्या अरुण अशाण यांच्या दहीहंडीत हा अनुचित प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी नशेबाज तरुणाला ताब्यात घेतलं. ही संपूर्ण घटना उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात घडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात