लातूर, 19 जून : शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमुळे (latur) नावारूपाला आलेल्या लातूर शहरातल्या ट्युशन एरियात गुन्हेगारांनी दहशत पसरवायला सुरुवात केली आहे. परजिल्ह्यातून आणि परराज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी लातुरात येतात. त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण करून पैसे उकळणारी क्राईम कंपनी लातुरात सक्रिय झाली आहे. इंस्टाग्रामवर शिवी दिल्यामुळे बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण (Inhuman beating of a 12th standard studen) करून खुनाचा प्रयत्न केला. एवढंच नाहीतर नग्न करून बेल्टने जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवरून शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरून बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचं सिने स्टाईल अपहरण करण्यात आलं. ही टोळी एवढ्यावर थांबली नाहीतर चक्क नग्न करून अमानुषपणे मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एकूण अकरा जणांनी मिळून हा प्रकार केल्याचं समोर आलं असून त्याचा धक्कादायक आणि अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. ( कुठल्याही एक्सपर्ट किंवा गॅरेजची गरज नाही, पावसाळ्यात कारची घरीच येता येईल काळजी ) पोलिसांच्या सतर्कतेमुळे घातपाताचा आरोपींचा कट उधळला असला तरी या आरोपींनी क्रौर्याची सीमा गाठली आहे. यातील दोन आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. तर इतर आरोपी त्यांचे हस्तक म्हणून काम करतात. याप्रकरणी पाच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर, इतर सहा आरोपी अद्यापही फरार आहेत. ( 10वी पास झालात? मग मुंबईत Indian Navy देणार 338 जणांना जॉबची मोठी संधी; करा अर्ज ) लातूर शहर हे शिक्षणासाठी नावारूपाला आलेलं शहर आहे त्यामुळं विद्यार्थ्यांचा ओढा लातूरकडे असतो. मात्र असे प्रकार जर लातुरात समोर आले ते शिक्षण क्षेत्राचं नाव मलिन होण्याची भीती लातूरकरांना वाटत आहे. जिल्ह्यातला क्राईम रेट कमी करण्यासाठी लातूरचे पोलीस अधीक्षक सक्रिय असतात. त्यामुळे ट्युशन एरियात थेट पोलीस चौकीची देखील स्थापना करण्यात आली. मात्र या पोलीस चौकीत नेहमी शुकशुकाटच असतो. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक गुन्हेगारांवर जरब बसवतील का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.