इंदुरीकरांच्या समर्थकाची बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना पाहून तुमच्या अंगावर येईल काटा

इंदुरीकरांच्या समर्थकाची बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना पाहून तुमच्या अंगावर येईल काटा

आपल्या पायात काटा रूतला की डोळ्यात टचकण पाणी येते. मात्र, एखादी व्यक्ती चक्क बाभळीच्या काट्यांवर झोपतो, ही कल्पनाच करवत नाही.

  • Share this:

बीड, 18 फेब्रुवारी:आपल्या पायात काटा रूतला की डोळ्यात टचकण पाणी येते. मात्र, एखादी व्यक्ती चक्क बाभळीच्या काट्यांवर झोपतो, ही कल्पनाच करवत नाही. पण अशीच एक बातमी समोर आली आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरात कुठे विरोध तर कुठे त्यांना पाठिंबा दिला जात आहे. इंदुरीकर यांनी जे बोललं ते सत्य आहे. त्यांच्यावर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे सांगत बीडच्या तांदळवाडी येथील महादेव मंदिरातील भगवान महाराज यांनी बाभळीच्या काट्यांवर निद्रासाधना सुरू केली आहे.

बीडपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या तांदळवाडी गावात महादेव मंदिर आहे. याच मंदिरात बारा वर्षांच्या तपासासाठी भगवान महाराज आले आहेत. गतवर्षी भगवान महाराजांनी पाऊस पडू दे म्हणून झाडावर स्वतःला टांगून घेऊन साधना केली होती. आता मात्र भगवान महाराजांनी चक्क इंदुरीकर यांना त्रास झाला म्हणून स्वतःला त्रास करत बाभळीच्या टोकदार काट्यावर निद्रस्त होऊन साधना सुरू केली.

भगवान महाराज हे मूळचे लिंबारुई या गावातील आहेत. त्यांचा बारा वर्षांचा तप आहे. गेल्या दोन वर्षांपासून तांदळवाडी येथील संगमेश्वर संस्थानात ते वास्तव्यास आहेत. इंदुरीकर यांच्या टीकेवरून राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळेच अध्यात्म धोक्यात आल्याचं सांगत भगवान महाराज यांनी अशी कठोर साधना सुरू केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा.. 'तू मला खूप आवडते...', असं म्हणत बारामतीत आरोपीने पकडला शाळकरी मुलीचा हात

त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे इंदुरीकर यांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं. मात्र, इंदुरीकर यांनी मंगळवारी पुन्हा पत्र प्रसिद्ध करून दिलगिरी व्यक्त केली आहे. असे असताना अध्यात्मावर डाग नको. म्हणून ही साधना सुरू आहे. त्यामुळे इंदुरीकर हे सत्यच आहे, असे भगवान महाराजांनी सांगितले आहे. मात्र ही खडतर साधना पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा.. चिनी व्हायरसला रोखणार पुणेरी लस; लवकरच होणार ह्युमन ट्रायल

First published: February 18, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या