जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तू मला खूप आवडते...', असं म्हणत बारामतीत आरोपीने पकडला शाळकरी मुलीचा हात

'तू मला खूप आवडते...', असं म्हणत बारामतीत आरोपीने पकडला शाळकरी मुलीचा हात

'तू मला खूप आवडते...', असं म्हणत बारामतीत आरोपीने पकडला शाळकरी मुलीचा हात

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मयूर शरद शेळके याच्यावर गुन्हा दाखल केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

बारामती, 18 फेब्रुवारी : बारामती शहरातील भिगवण रोडवरील हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत असणार्‍या मुलीचा पाठलाग करून तिची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मयूर शरद शेळके याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडीत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी मयुर शरद  शेळके, (वय 21 वर्षे, रा. गोखळी मेखळी रोड, दत्तमंदीर गुणवडी ता.बारामती) हा रिक्षा चालक असून पीडीत मुलीला हा रिक्षामधून वाईट नजरेने पहात असे. तू मला खुप  आवडते, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू माझ्याशी मैत्री कर, असे म्हणून आरोपी त्या मुलीशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, असं त्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी मयूर शेळके हा पीडित मुलीच्या घरापासून पाठलाग करून तिला रस्त्यामध्ये अडवून तिचा हात पकडून माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू हो म्हण नाहीतर मी माझे जिवाचे काहीतरी करून घेईन अशी धमकी देत असे. तसंच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी तात्काळ बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पथक पाठऊन सदर आरोपीला अटक केली आहे. मेडिकल स्टोअर्सवरच सुरू होता गोरखधंदा; पोलिसांनी धाड टाकून केला रंगाचा बेरंग! याप्रकरणी आरोपी मयूर शरद शेळके याच्यावर भा.द.वि. कलम 341,354,354(अ),354(ड),506 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 चे कलम 8,12 विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: baramati
  • First Published :
जाहिरात
जाहिरात