• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • धक्कादायक! देशातील निम्म्यापेक्षा जास्त Delta plus कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

धक्कादायक! देशातील निम्म्यापेक्षा जास्त Delta plus कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रात

देशातील एकूण डेल्टा प्लस कोरोना प्रकऱणांपैकी सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात दिसून आली आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच आता डेल्टा प्लस कोरोनाचं संकट आ वासून उभं राहिलं आहे. गेले काही दिवस राज्यातील काही जिल्ह्यांत डेल्टा प्लस (Delta plus) कोरोना रुग्ण आढळून येत असताना आता केंद्र सरकारने जारी केलेल्या आकड्याने तर धक्काच दिला आहे. देशातील निम्म्यापेक्षा जास्त डेल्टा प्लस रुग्ण (Delta plus corona variant)  हे एकट्या महाराष्ट्रातच आहे, असंच या आकडेवारीवरून दिसतं. देशात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 86 प्रकरणं आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.  नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे (NCDC) संचालक डॉ. सुजीत सिंह यांनी ही माहिती दिली. तर महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 45 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसापूर्वी हा आकडा सांगितला होता. म्हणजेच देशातील एकूण डेल्टा प्लस प्रकरणांपैकी निम्म्यापेक्षा जास्त एकट्या महाराष्ट्रातच आहे, हेच ही आकडेवारी सांगते. हे वाचा - राज्यात पुन्हा Delta plus चं थैमान; निर्बंध शिथील झाले म्हणून हलगर्जीपणा करू नको राज्यात डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शून्यावर आली होती. पण आता डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली. पण आता 22 जिल्ह्यांत निर्बंध शिथील झाले सोबतच डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 2 महिन्यांनंतर पुन्हा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत ऑगस्टमध्ये गेल्या काही दिवसांतच 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती डेल्टा प्लस रुग्ण नाशिकमध्ये  एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे. मराठवाड्यातील बीड आणि औरंगाबाद इथं डेल्टा प्लसचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरीतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. हे वाचा - दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट; मुंबईतील रिकव्हरी रेटही वाढला रुग्ण वाढत असले तरी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याने डेल्टा आणि डेल्टा प्लसला नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. पण जिथे रुग्ण वाढतात तिथे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
  Published by:Priya Lad
  First published: