राज्यात डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शून्यावर आली होती. पण आता डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे.
जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली.
पण आता 22 जिल्ह्यांत निर्बंध शिथील झाले सोबतच डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 2 महिन्यांनंतर पुन्हा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत.
आता ऑगस्टमध्ये गेल्या काही दिवसांतच 7 जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
नाशिकमध्ये एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे.
पण आता 22 जिल्ह्यांत निर्बंध शिथील झाले सोबतच डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 2 महिन्यांनंतर पुन्हा डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण वाढत असले तरी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याने डेल्टा आणि डेल्टा प्लसला नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन देखील टोपेंनी केलं. पण जिथे रुग्ण वाढतात तिथे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असंही टोपे म्हणाले.