जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आमदार-खासदार गेले आता क्रिकेटपटूही चालले! टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी घेतली शिंदेंची भेट, Video

आमदार-खासदार गेले आता क्रिकेटपटूही चालले! टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी घेतली शिंदेंची भेट, Video

आमदार-खासदार गेले आता क्रिकेटपटूही चालले! टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी घेतली शिंदेंची भेट, Video

शिंदेंकडे (Eknath Shinde camp) जवळपास रोजच शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि पदाधिकारी दाखल होत असतानाच दोन क्रिकेटपटूंनी (Indian cricketer) घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठं खिंडार पडलं. एकनाथ शिंदेंनी पहिले आमदार (MLA) मग खासदार (MPs) आणि त्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर आपल्या बाजूने वळवलं. शिंदेंकडे जवळपास रोजच शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी दाखल होत असतानाच दोन क्रिकेटपटूंनी घेतलेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची भेट घेतली आहे. रैना आणि केदार जाधव यांची ही भेट सदिच्छा भेट असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

जाहिरात

जून महिन्यात विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा 50 आमदारांना घेऊन बंड केलं. शिंदे यांच्या या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आमदारांनंतर शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवला आणि लोकसभेतला पक्षाचा गटनेता आणि प्रतोद बदलला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धन्युष्य बाणाच्या चिन्हावरही निवडणूक आयोगाकडे दावा ठोकला, याची सुनावणी 8 ऑगस्टला निवडणूक आयोगाकडे होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडावर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या सर्व प्रकरणाची बुधवार 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेलं हे सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आता उद्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात