जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : आयकर विभागाचा हिरानंदानी ग्रुपवर छापा, बांधकाम क्षेत्रात खळबळ

BREAKING : आयकर विभागाचा हिरानंदानी ग्रुपवर छापा, बांधकाम क्षेत्रात खळबळ

BREAKING : आयकर विभागाचा हिरानंदानी ग्रुपवर छापा, बांधकाम क्षेत्रात खळबळ

आज सकाळी मुंबई, बंगळुरू, ठाण्यासह देशात एकूण 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 22 मार्च : आयकर विभागाकडून (Income tax department ) गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू आहे. आज आयकर विभागाने देशातील नामांकित असलेल्या हिरानंदानी ग्रुपवर (Hiranandani group) छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ( Income tax department raids Hiranandani group) आयकर विभागाकडून मुंबईमध्ये धाडसत्र सुरू आहे. आज सकाळी मुंबई, बंगळुरू, ठाण्यासह देशात एकूण 25 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. ठाण्यात हिरानंदानी ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या कर चोरी प्रकरणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.  रियल इस्टेटमध्ये काळा पैसा गुंतवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. हिरानंदानी ग्रुपवर छापा टाकल्यामुळे बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पुणे आणि ठाण्यात बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या कंपनीवर छापा दरम्यान, पुणे आणि ठाण्यातील युनिकॉर्न स्टार्ट अप्स ग्रुपची कार्यालये आणि संबंधित जागांवर  प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 9 मार्च 2022 रोजी छापे घातले होते. ही कंपनी, बांधकाम साहित्याचा घाऊक आणि किरकोळ पुरवठा करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा देशभर वावर असून त्यांची वार्षिक उलाढाल 6000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या शोधमोहिमेदरम्यान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात एकूण 23 ठिकाणी करवाई करण्यात आली. ( पायऱ्यांवर करत होता बाईक स्टंट; तोल जाताच घडली मोठी दुर्घटना, Shocking Video ) या शोध मोहिमेदरम्यान अनेक महत्वाचे पुरावे -ज्यात कागदपत्रे आणि डिजिटल डेटाचा समावेश आहे, अशी माहिती मिळाली असून हे सगळे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरुन, या कंपनीने अनेक बनावट खरेदी, बेहिशेबी रोखीचे व्यवहार केले असल्याचे आढळले आहे, त्याशिवाय साधारण 400 कोटी रुपयांच्या बेहिशेबी नोंदी देखील आढळल्या आहेत. या सगळ्या पुराव्याबाबत कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारे व्यवहार केल्याची कबुली दिली. तसंच, विविध मूल्यांकन वर्षात 224 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्न मिळवल्याचेही सांगितले. ( Gold Price Today : सोने-चांदी दरात आज पुन्हा तेजी, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव ) ही छापेमारी आणि शोधमोहिमेत असेही आढळले की, या कंपनीला मॉरिशस मार्गे मोठा परदेशी निधी देखील मिळाला आहे. मोठ्या प्रीमियमच्या समभागांच्या माध्यमातून हा निधी मिळाला आहे, असेही लक्षात आले.  शोध मोहिमेदरम्यान, मुंबई आणि ठाण्यातील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काही हवाला व्यवहार होत असल्याचेही आढळले.  या कारवाई दरम्यान आतापर्यंत, 1 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम आणि 22 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात