जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pandharpur Shiv Sena : बंडखोर आमदारांचा निषेध म्हणून पट्टाने हॉटेलमध्ये सुरू केली गद्दार थाळी अन् 50 खोके थाळी

Pandharpur Shiv Sena : बंडखोर आमदारांचा निषेध म्हणून पट्टाने हॉटेलमध्ये सुरू केली गद्दार थाळी अन् 50 खोके थाळी

Pandharpur Shiv Sena : बंडखोर आमदारांचा निषेध म्हणून पट्टाने हॉटेलमध्ये सुरू केली गद्दार थाळी अन् 50 खोके थाळी

50 खोके एकदम ओक्के हा ही नारा महाराष्ट्रभर पसरला. दरम्यान राज्यभरातील शिवसैनिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. अशीच एक घटना पंढपुरात घडली आहे. याची चर्चा राज्यभर होत आहे. (Pandharpur Shiv Sena)

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

पंढरपूर, 14 सप्टेंबर : मागच्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर मागच्या दोन महिन्यांपासून बंडखोर आमदार आणि शिवसेनेतील आमदारांच्यात कलगीतुरा रंगताना पहायला मिळत आहे. (Pandharpur Shiv Sena) दरम्यान शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना गद्दार म्हणून घोषीत केल्यानंतर हा वाद जोरदार पहायला मिळाला. तसेच 50 खोके एकदम ओक्के हा ही नारा महाराष्ट्रभर पसरला. दरम्यान राज्यभरातील शिवसैनिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. अशीच एक घटना पंढपुरात घडली आहे. याची चर्चा राज्यभर होत आहे.

जाहिरात

मागच्या काही दिवसांपूर्वी बैलपोळा सण अखंड राज्यात संपन्न झाला यावेळी राज्यातील विविध भागातील शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा निषेध म्हणून जनावरे रंगवली होती. यामध्ये त्यांनी जनावरांच्या पाठीवर 50 खोके एकदम ओक्के, गद्दारांना महाराष्ट्र नाही गुवाहाटी दाखवा, काय झाडी काय डोंगार काय हाटील यासारखे अनेक डायलॉग राज्यात मागच्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहेत. दरम्यान पंढरपुरातील एका शिवसैनिकांना आपल्या हॉटेलचं मेन्यू कार्डच बदलले आहे. या मेन्यू कार्डमधून हॉटेल चालकाने थेट बंडखोर शिवसैनिकांचा निषेध म्हणून गद्दार थाळी आणि 50 खोके एकदम ओक्के अशा थाळ्यांना नाव देत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान त्याने या आमदारांना जेवणाचे आमंत्रणही दिले आहे.

हे ही वाचा :  आदित्य ठाकरेंचं सरकारवर आरोपास्त्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर, म्हणाले…

पंढरपूर-सांगोला मार्गावर एका हॉटेल चालकाने त्या हॉटेलच्या दारात उभे राहताच बंडखोरी केलेल्या 40 आमदारांची तु्म्हाला आठवण होईल अशीच व्यवस्था केली आहे. पंढरपुरातील कट्टर शिवसैनिकाने आपल्या हॉटेलमधील थाळीला 40 गद्दार आणि 50 खोके एकदम ओके असे नाव दिले आहे. आतापर्यंत राज्यात बुलेट थाळी, बाहुबली थाळी अशा अनेक नावांनी थाळ्या समोर आल्या आहेत. मात्र, या शिवम हॉटेलमध्ये येताच 40 गद्दार थाळीचे वेगळेपण काय हे देखील सांगण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे हॉटेल चालकाचे म्हणणे आहे.

जाहिरात

शिवसेना एक संघटना होती. यामधील प्रत्येक कार्यकर्ता हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारामुळे घडलेला आहे. असे असताना ज्यांच्या मुळे या 40 आमदारांना पद, प्रतिष्ठा मिळाली त्यांनीच आपल्याच ताटामध्येच छेद केले. त्यामुळे 40 गद्दार ही थाळी सुरु करण्यात आल्याचे संजय घोडके यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा :  दसरा मेळावा होणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम, ठिकाण कोणतं?

जाहिरात

हॉटेलमधील थाळींना केवळ असे नावच देण्यात आले नाही तर गद्दारांनी याचा खाण्यास यावे असे आवाहन शिवसैनिकांनी केले आहे. तर पंढरपूर-सांगोला या मार्गावरुन सांगोल्याचे आमदार शहाजीबापू हे सातत्याने मार्गस्थ होत असतात. त्यांनी या थाळीचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर त्या गद्दार आमदारांची किंमतच कमी झाल्याने थाळीची किंमतही केवळ 100 आणि 50 रुपये अशी ठेवण्यात आली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात